Video: Zomato करणार ड्रोनद्वारे फूड डिलिव्हरी; 15 मिनिटात पोहचणार पार्सल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:43 PM2019-06-13T13:43:02+5:302019-06-13T13:43:43+5:30

हायब्रिड ड्रोनचा वापर करत झोमेटॉने ही चाचणी पूर्ण केली आहे. 5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ड्रोनला 10 मिनिटांचा अवधी लागला. 

Video: Zomato will supply food through a drone; Parcel arrives in 15 minutes | Video: Zomato करणार ड्रोनद्वारे फूड डिलिव्हरी; 15 मिनिटात पोहचणार पार्सल 

Video: Zomato करणार ड्रोनद्वारे फूड डिलिव्हरी; 15 मिनिटात पोहचणार पार्सल 

Next

नवी दिल्ली - फूड डिलिव्हरी करणारी प्रसिद्ध कंपनी झोमेटॉने आणखी एक पाऊल पुढे जात ड्रोनद्वारे खाद्यपदार्थ पार्सल करण्याची चाचणी यशस्वीरित्या पार केली आहे. कंपनीने बुधवारी ट्विट करुन ही माहिती दिली. ड्रोनद्वारे खाद्यपदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेण्याची चाचणी करण्यात आली. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने लखनऊ येथील स्टार्टअप कंपनी टेक ईगल इनोव्हेशन हस्तांतरित करण्याची घोषणा केली होती. हायब्रिड ड्रोनचा वापर करत झोमेटॉने ही चाचणी पूर्ण केली आहे. 5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ड्रोनला 10 मिनिटांचा अवधी लागला. 


झोमेटॉचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंदर गोयल यांनी ट्विट करत येणाऱ्या काळात फूड डिलिव्हरी वेळेच्यापूर्वी करण्यासाठी हवाई मार्ग हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं. फूड डिलिव्हरी करण्याचा वेळ 30 मिनिटांवरुन 15 मिनिटे होऊ शकतो. रस्त्यावरुन वाहतूक करुन वेळ कमी करणे शक्य होणार नाही. आपल्याला सतत काही ना काही नवीन गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. ड्रोनद्वारे फूड पॅकेट डिलिव्हरी करण्यासाठी 80 किमी प्रतितास क्षमता सिद्ध केली आहे. झोमेटॉकडून हायब्रिड ड्रोनचा वापर करत पाच किलो वजनाचे फूडची डिलिव्हरी नियोजित पत्त्यावर स्वय:चलित पद्धतीने केली आहे.  

Web Title: Video: Zomato will supply food through a drone; Parcel arrives in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न