ट्विटरवर 20-30 रुपयांना मुलींचे व्हिडिओ, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी फोटोंसह पुरावा सादर केला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:11 PM2022-09-20T18:11:21+5:302022-09-20T18:12:33+5:30

'ट्विटरवर महिलांचे अंघोळ करताना किंवा बलात्काराचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत'- स्वाती मालीवाल

Videos of girls on Twitter for Rs 20-30, Women's Commission Chairperson presents evidence with photos | ट्विटरवर 20-30 रुपयांना मुलींचे व्हिडिओ, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी फोटोंसह पुरावा सादर केला

ट्विटरवर 20-30 रुपयांना मुलींचे व्हिडिओ, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी फोटोंसह पुरावा सादर केला

Next

नवी दिल्ली: नुकताच मोहालीत विद्यापीठातील तरुणींचा एमएमएस शूट केल्याचा प्रकार समोर आला, ज्यामुळे देशभरात गोंधळ उडाला आहे. यातच आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया आणि ट्विटरवर चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत मोठा दावा केला आहे. 'जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेले ट्विटर, लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकण्याचे माध्यम बनले आहे. ट्विटरवर लहान मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ आहेत. 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकले जातात,' असा दावा त्यांनी केला आहे.

याप्रकरणी ट्विटर इंडियाच्या प्रमुखाला समन्स पाठवण्यात आल्याचे मालीवाल यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांना दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन उत्तर देण्यासाठी बोलावले आहे. ट्विटर फक्त अमेरिकन कायद्याचे पालन करते का, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या डीसीपींनाही समन्स बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आयोगानेही तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तातडीने एफआयआर नोंदवावा. जर आमच्या समन्सला प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही अटक वॉरंटदेखील जारी करू शकतो, दिल्ली महिला आयोगाला हे करण्याचा अधिकार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


परदेशात कायद्याचे पालन, भारतात नाही
स्वाती मालीवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हजारो लोक लहान मुलींवर झालेल्या बलात्काराचे व्हिडिओ शेअर करत आहेत. छुप्या कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडिओही टाकले जात आहेत. या कंपन्या परदेशातील कायद्यांचे पालन करतात आणि भारतातील महिलांवरील अश्लीलता आणि बलात्काराकडे डोळेझाक करतात. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक, ट्विटर हे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकण्याचे माध्यम बनले आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या व्हिडिओन ट्विटर भरले आहे. 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकले जात आहेत.
 

Web Title: Videos of girls on Twitter for Rs 20-30, Women's Commission Chairperson presents evidence with photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.