विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ - काँग्रेसचा अंतर्गत अहवाल

By admin | Published: September 4, 2014 01:32 PM2014-09-04T13:32:00+5:302014-09-04T13:49:20+5:30

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर आता तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव होण्याची शक्यता काँग्रेसच्याच अंतर्गत अहवालात वर्तवण्यात आली आहे.

In the Vidhan Sabha elections, the defeat of the Congress - internal report of the Congress | विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ - काँग्रेसचा अंतर्गत अहवाल

विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ - काँग्रेसचा अंतर्गत अहवाल

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, ४ - लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर आता तीन राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव होण्याची शक्यता काँग्रेसच्याच अंतर्गत अहवालात वर्तवण्यात आली आहे. 
महाराष्ट्र , हरियाणा आणि झारखंडमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याविषयी काँग्रेसने एक अहवाल तयार केला असून यात काँग्रेसचा पराभव होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. अहवालातील सर्वेक्षणानुसार, हरियाणातील सत्ताधारी पक्ष असलेला काँग्रेसला निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व इंडियन नॅशनल लोकदलापेक्षा कमी जागा मिळून तो तिस-या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला ७०पेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाहीत, अशी माहितीही अहवालातून समोर येत आहे. 
काँग्रेस पक्ष झारखंडमध्ये झारखंड मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय जनता दल व संयुक्त जनता दलासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही आघाडी झाली तरीही राज्यात भारतीय जनता पक्षाचीच स्थिती मजबूत राहील, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

Web Title: In the Vidhan Sabha elections, the defeat of the Congress - internal report of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.