विधी-१५-विदर्भावर देवेंद्र प्रसन्न - आश्वासनांचा पाऊस

By admin | Published: December 19, 2014 11:55 PM2014-12-19T23:55:45+5:302014-12-19T23:55:45+5:30

विधी-१५-विदर्भावर देवेंद्र प्रसन्न - आश्वासनांचा पाऊस

Vidya-15-Devendra delighted on Vidarbha - rain of promises | विधी-१५-विदर्भावर देवेंद्र प्रसन्न - आश्वासनांचा पाऊस

विधी-१५-विदर्भावर देवेंद्र प्रसन्न - आश्वासनांचा पाऊस

Next
धी-१५-विदर्भावर देवेंद्र प्रसन्न - आश्वासनांचा पाऊस
अन् पूर्ततेची ग्वाही- गोसीखुर्द प्रकल्प
तीन वर्षांत पूर्ण करणार
-अमरावती, अकोला विमानतळांचा विकास
- पूर्व विदर्भाचे पाणी पि›म विदर्भाला देणार
-अमरावतीत टेक्स्टाईल हब
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा विधानसभेत केली. या योजना निि›त वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार करताना महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प २०१७ मध्ये पूर्ण करू, विदर्भातील १०२ सिंचन प्रकल्प येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले. रस्ते, सिंचन, विपणन, हवाई वाहतूक, पर्यटन, उद्योग यावर फोकस असलेल्या योजना त्यांनी जाहीर केल्या.
विदर्भात आतापर्यंत नागपूरपुरते मर्यादित असलेले हवाईिवश्व फडणवीस यांनी अमरावती, अकोल्यासाठी खुले करण्याची घोषणा केली.
दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, विजय वडे˜ीवार या ज्येष्ठ सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर दोन दिवसांच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिले. आघाडी सरकारने दहा वर्षांत न घेतलेले निर्णय आम्ही दहा दिवसांत घेतले. आमच्याकडे आघाडीसारखी ओढाताण होत नाही. विदर्भाच्या विकासाची तळमळ गेल्या १५ वर्षांत दिसली नाही आता ती कृतीतून दिसेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
अमरावती विमानतळाचा
तीन वर्षांत विस्तार
अमरावतीचे (बेलोरा) विमानतळ वर्षभर सारख्याच क्षमतेने चालेल अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. तेथे रात्रीच्या लँडिंगची सोय केली जाईल. तसेच, तेथील धावप˜ी २३०० बाय ६० मीटर इतकी वाढविली जाईल. या बाबत विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा झाली असून तीन वर्षांत विस्ताराचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर तेथे बोईंग, एअरबस ३२० सारखी जम्बो विमाने उतरू लागतील आणि विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अकोल्याच्या विमानतळासाठी
कृषी विद्यापीठाला तंबी
अकोला आणि शिर्डी विमानतळाचा विकास करण्यात येईल, असेही ते म्हणाले. अकोल्याच्या विमानतळासाठी कृषी विद्यापीठाची जमीन दिली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते म्हणाले की एक महिन्याच्या आत ती द्यावीच लागेल. विद्यापीठाने आडकाठी आणली तर आपण आपले अधिकार वापरू, अशी तंबीही त्यांनी दिली.
उद्योगांना स्वस्त वीज
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या बाजूच्या राज्यांमध्ये आपल्यापेक्षा स्वस्त वीज आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ओपन ॲक्सेसमधून विदर्भातील उद्योगांना स्वस्त वीज देणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी शासन वीज नियामक आयोगाकडे मंजुरी मागेल, असे ते म्हणाले.
अमरावतीत टेक्स्टाईल हब
अमरावतीनजीकच्या नांदगावपेठ एमआयडीसीत टेक्स्टाईल हब उभारण्यात येईल. त्या ठिकाणी दोन वर्षांत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ६५०० जणांना रोजगार दिला जाईल. टेक्स्टाईल हबमधील उद्योगांना अनुदान दिले जाईल. तीन उद्योजकांना आधीच जमीन देण्यात आली आहे आणखी सहा उद्योग येण्यास इच्छुक आहेत. त्यांना फास्ट ट्रॅक मंजुरी दिली जाईल. याशिवाय चंडीगडच्या एका नामांकित कंपनीनेही जागा पाहिली आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Vidya-15-Devendra delighted on Vidarbha - rain of promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.