तळेगावमध्ये विद्याधाम प्रशाला प्रथम
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:28+5:302015-02-18T00:13:28+5:30
Next
>तळेगाव ढमढेरे : येथे झालेल्या फेस्टिव्हलमध्ये एकूण ५३ संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन लहान गटात विद्याधाम प्रशाला शिक्रापूर व मोठ्या गटात हंबीरबाबा विद्यालय टाकळी भीमा या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तळेगाव फेस्टिव्हल २०१५ चे उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती मंगलदास बांदल, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, सरपंच अनिल भुजबळ, शिक्रापूरचे सरपंच संजय जगताप, माजी सरपंच विश्वास ढमढेरे, पोपट भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके व बक्षीस वितरण माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, बाजार समितीचे संचालक रामभाऊ सासवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. या फेस्टिव्हलमध्ये शालेय व खुल्या कॅसेट रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटातील बक्षिसपात्र संघ विद्याधाम प्रशाला-शिक्रापूर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी, बबईताई टाकळकर आश्रमशाळा निमगाव म्हाळुंगी, प्राथमिक शाळा माळवाडी, माहेर संस्था वळू बु. प्राथमिक शाळा गुरव मळा, गुजर प्रशाला, जयवंत पब्लिक स्कूल सणसवाडी, ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम तळेगाव ढमढेरे. मोठा गट : सद्गुरू हंबीरबाबा विद्यालय-टाकळी भीमा, लॉकर बॉईज ग्रुप अहमदनगर, माहेर संस्था वढू बु., गुजर प्रशाला, श्रीराम विद्यालय, टाकळी भीमा, बबईताई टाकळकर आश्रमशाळा निमगाव म्हाळुुंगी, संभाजीराव भुजबळ विद्यालय-तळेगाव ढमढेरे, हिराबाई गोपाळराव गायकवाड, हायस्कूल या संघांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निवेदक पोपट इंगवले व अशोक रासकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम पार पाडण्यास प्रतिष्ठानचे महेंद्र पिंगळे, धनंजय भुजबळ, रमेश भुजबळ, गणेश तोडकर, सोमनाथ बाळसराफ यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)छायाचित्र ओळी : लहान गटात प्रथम क्रमांक मिळविलेला विद्याधाम प्रशालेचा संघ नृत्य सादर करताना. ०००००