राजपथावर घडले संस्कृती व लष्करी सामर्थ्याचे दर्शन

By Admin | Published: January 26, 2015 09:32 AM2015-01-26T09:32:34+5:302015-01-26T12:51:10+5:30

भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ, सैन्याच्या जवानांच्या चित्तथरारक कसरती आणि ओबामांची उपस्थिती अशा वातावरणात राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

View of the culture and military power of the kingpath | राजपथावर घडले संस्कृती व लष्करी सामर्थ्याचे दर्शन

राजपथावर घडले संस्कृती व लष्करी सामर्थ्याचे दर्शन

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, २६ - भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ, सैन्याच्या जवानांच्या चित्तथरारक कसरती आणि ओबामांची उपस्थिती अशा वातावरणात राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 

दिल्लीतील राजपथावर ६६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड पार पडली. शनिवारी रात्रीपासून दिल्लीत रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. खराब वातावरणामुळे संचलनात हवाई दलाच्या फ्लायपास्टविषयी शंका उपस्थित होत होत्या.मात्र सकाळी नऊनंतर पावसाने विश्राम घेत सर्वांना दिलासा दिला. 

सकाळी पावणे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमर ज्योती जवान येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दहाच्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व सोहळ्यातील प्रमुख पाहुणे बराक ओबामा यांचे राजपथावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर काही वेळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे राजपथावर पोहोचले. राष्ट्रपतींचे मंचावर आगमन झाल्यावर राष्ट्रगीत सुरु झाले व २१ तोफांच्या सलामीत ध्वजारोहण करण्यात आले. 

ध्वजारोहणानंतर शहीद मेजर मुकुंद वर्दराजन आणि नायक नीरजकुमार सिंह यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शहिदांच्या पत्नींनी हा सन्मान स्वीकारला. अशोक चक्र प्रदान केल्यावर प्रजासत्ताक दिनी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संचलनाला दिमाखात सुरुवात झाली. भारतीय सैन्याच्या जवानांनी चित्तथरारक कसरती सादर करत बराक ओबामांची दादही मिळवली. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील संस्कृतीचे घडवणारे चित्ररथही या परेडमध्ये बघायला मिळाले. यासोबतच भारताच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या ब्राह्मोस, टी - ९० रणगाडे, मिग ७० हेलिकॉप्टर, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे आकाश मिसाईल आणि वेपन लोकेटींग रडार या शस्त्रास्त्रांचे दर्शनही या परेडमध्ये घडले. यंदाच्या परेडमध्ये हवाई आणि नौदलातील महिला अधिका-यांचे पथक हे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. स्त्रीशक्तीचा संदेश देण्यासाठी दोन्ही दलातील महिला अधिका-यांच्या पथकांचा परेडमध्ये समावेश करण्यात आला होता. 

  

Web Title: View of the culture and military power of the kingpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.