२२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

By admin | Published: April 26, 2016 11:11 PM2016-04-26T23:11:29+5:302016-04-26T23:11:29+5:30

जळगाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.

Vihir acquisition in 220 villages: New water wells in 841 locations Tankers water supply in 51 villages | २२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

२२० गावात विहीर अधिग्रहण : ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी ५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा

Next
गाव : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पारोळा, अमळनेर व जामनेर तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.
३५९ गावांमध्ये टंचाईस्थिती
सलग दुसर्‍या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे यावर्षी पाणी टंचाई असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या जळगाव जिल्‘ातील ३५९ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरविणे, विहीर अधिग्रहण करणे, तात्पुरत्या पाणी योजना राबविणे यासारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
५१ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा
सध्या जिल्हा प्रशासनातर्फे ५१ गावांमध्ये ४३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यात १० शासकीय तर खाजगी ३३ टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. जामनेर तालुक्यातील १४ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १५ गावांमध्ये, अमळनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
८४१ नवीन विंधन विहीर
जिल्हा प्रशासनाने तब्बल ८४१ नवीन विंधन विहिरीसाठी मंजुरी दिली आहे. तर २२० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ४५ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर धरणगाव तालुक्यात३७ गावांमधील ४१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ३५ गावांमध्ये ३३ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे.

३८९ गावांत विधन विहीर
पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रत्येक तालुक्यात जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाभरात ३८९ गावांमधील ८४१ ठिकाणी नवीन विंधन विहीर देण्यात आल्या आहेत. यात चाळीसगाव तालुक्यातील ९० गावांमध्ये सर्वाधिक २२३ विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत. तर जामनेर तालुक्यात फक्त दोन गावांमध्ये पाच नवीन विंधन विहिरी देण्यात आल्या आहेत.

जामनेर, पारोळा व अमळनेर तालुक्यात गंभीर स्थिती
जामनेर तालुक्यातील सर्वाधिक ८५ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील ६८ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. त्या पाठोपाठ अमळनेर तालुक्यातील ५२ गावांमध्ये टंचाईस्थिती असणार आहे. चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातील गावांची संख्या ५० पेक्षा जास्त असल्याने या ठिकाणी भीषण पाणी टंचाई भासत आहे.

Web Title: Vihir acquisition in 220 villages: New water wells in 841 locations Tankers water supply in 51 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.