विजय दर्डा 'आयटी' संसदीय समितीवर
By Admin | Published: September 9, 2014 04:16 AM2014-09-09T04:16:02+5:302014-09-09T04:16:02+5:30
लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची २0१४- १५ या वर्षासाठी संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक (आयटी) स्थायी समितीवर नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन खा. विजय दर्डा यांची २0१४- १५ या वर्षासाठी संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक (आयटी) स्थायी समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांची कारकीर्द १ सप्टेंबरपासून सुरू झाली.
अनुरागसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वातील ३१ सदस्यीय समितीत लालकृष्ण अडवाणी, प्रसून बॅनर्जी, डॉ. सुनील गायकवाड, वरुण गांधी, हेमंत गोडसे, डॉ. अनुपम हाजरा, दीपेंदरसिंग हुडा, डॉ. जे. जयवर्धन, पी. करुणाकरन, वीरेंद्र कश्यप, हरिंदरसिंग खालसा, हेमामालिनी, केशवप्रसाद मौर्य, मेहबूबा मुफ्ती, परेश रावल, डॉ. भारतीबेन शियाल, अभिषेकसिंग, डी.के. सुरेश, रामदास तडस आणि आर. वनरोजा(सर्व लोकसभा) यांचा समावेश आहे. या समितीत स्थान देण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांमध्ये खा. दर्डा यांच्यासह मोहम्मद आदिब, जावेद अख्तर, सलीम अन्सारी, जया बच्चन, सांतीउसे कुजूर, डेरेक ओ ब्रायन, डॉ. के.व्ही.पी. रामचंद्रन राव, सचिन तेंडुलकर, महंत शंभूप्रसादजी तुंडिया हे आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)