विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 08:38 PM2018-01-01T20:38:13+5:302018-01-01T21:37:31+5:30

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली आहे. एस. जयशंकर यांचा 28 जानेवारीला कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं त्यांच्या जागी विजय गोखलेंना बढती देण्यात आली आहे.

Vijay Keshav Gokhale appointed as Foreign Secretary | विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती

googlenewsNext

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं विजय केशव गोखले यांची परराष्ट्र सचिवपदी नियुक्ती केली आहे. एस. जयशंकर यांचा 28 जानेवारीला कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं त्यांच्या जागी विजय गोखलेंना बढती देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 ते दोन वर्षापर्यंतचा कालावधीसाठी त्यांना परराष्ट्र सचिवपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. विजय केशव गोखले हे 1881 सालच्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. विजय गोखले यांनी चीन, जर्मनी आणि मलेशिया या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे.गोखले सद्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) पदावर कार्यरत आहेत. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (डीओपीटी) जारी आदेशानुसार, कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने गोखले यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.



मँडारिन उत्तम प्रकारे बोलणारे अधिकारी
विजय गोखले हे मँडारिन भाषेत उत्तम संवाद साधू शकतात. त्यांनी भारताचे चीनमधील राजदूत म्हणूनही काम केले आहे. परराष्ट्र मंत्रालयात त्यांनी डायरेक्टर (चायना अँड इस्ट एशिया) आणि जाँइंट सेक्रेटरी (ईस्ट एशिया) या पदांवर काम केले आहे. तसेच हनोई, हाँगकाँग येथेही सेवा बजावली असल्याने त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताला चीनविषयक समस्या सोडवण्यास आणि पूर्व आशियाई देशांशी संबंध अधिक दृढ करण्यास मदत होणार आहे. विजय गोखले यांनी जर्मनीमध्येही भारताचे राजदूत म्हणून कार्य केले आहे.


 

Web Title: Vijay Keshav Gokhale appointed as Foreign Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.