विजय माल्या बुडीत कर्जप्रकरणी 9 जणांना न्यायालयीन कोठडी

By admin | Published: January 24, 2017 06:06 PM2017-01-24T18:06:57+5:302017-01-24T18:41:28+5:30

विजय माल्याच्या बुडीत कर्जप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह 8 जणांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Vijay Mallya 9 judicial custody for bad loans | विजय माल्या बुडीत कर्जप्रकरणी 9 जणांना न्यायालयीन कोठडी

विजय माल्या बुडीत कर्जप्रकरणी 9 जणांना न्यायालयीन कोठडी

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 24 - विजय माल्याच्या बुडीत कर्जप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह 8 जणांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
विजय माल्याच्या बुडीत कर्जप्रकरणी सीबीआयने आयडीबीआय बँक आणि किंगफिशर एअरलाइन्सवर गुन्हा दाखल करुन याप्रकरणी किंगफिशरचे 4 अधिकारी आणि आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह चार माजी अधिका-यांना सोमवारी अटक केली. दरम्यान, याप्रकरणी सर्व आरोपींवर आज आरोपपत्र दाखल करण्यात आले असून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, याप्रकरणी पुढील सुनावणी 30 जानेवारीला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. 
विजय माल्याच्या नेतृत्वाखाली असलेल्या यूबी ग्रुपवर सीबीआयने धाड टाकल्या असून विजय माल्याने 6 हजार 209 कोटी रुपयांच्या बुडवलेल्या कर्जाची यूबी ग्रुपकडूनच वसुली करण्यात येत आहे.
बँकांचे कर्ज बुडवल्यानंतर मल्या 2 मार्च 2016लाच इंग्लंडला पळून गेला. सक्तवसुली संचलनालयाच्या याचिकेवरून माल्यावर हवाला रॅकेट चालवत असल्याचा ठपकाही मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला आहे.
 

 

Web Title: Vijay Mallya 9 judicial custody for bad loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.