विजय माल्या फरार म्हणून घोषित
By admin | Published: June 14, 2016 05:13 PM2016-06-14T17:13:14+5:302016-06-14T17:24:10+5:30
बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय माल्याला आज मुंबईच्या विशेष न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ : बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय माल्याला आज मुंबईच्या विशेष न्यायालयाने फरार म्हणून घोषित केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने आज निर्णय दिला. यापुर्वी माल्याचा पासपोर्ट जप्त केला आहे.
बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केली आहे. आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. विशेष म्हणजे ईडी सध्या फक्त आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर 17 बँकांच्या थकलेल्या 9000 कोटी कर्जासंबंधीही तपास सुरु आहे.
दरम्यान, सक्तीवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यापूर्वीच त्यांनी शनिवारी आपल्या काही कोटींच्या दोन संपत्तींची विक्री करून टाकली होती, अशी माहिती मिळाली आहे. लंडनमध्ये असलेले मल्ल्या यांनी आपली संपत्तीची विक्री सुरू केली असल्याची कुणकुण ईडीला लागल्यामुळेच तातडीने जप्तीची कारवाई करण्यात आली.