विजय माल्या ठग नव्हे, सभ्य माणूस - फारूख अब्दुल्ला
By admin | Published: March 11, 2016 05:27 PM2016-03-11T17:27:28+5:302016-03-11T17:31:37+5:30
विजय माल्या काही ठग वा भ्रष्टाचारी नाहीत, ते एक सभ्य व्यक्ती आहेत असे म्हणत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला माल्ल्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - ' आपण भारतातून पळालेलो नाही, फरार नाही' असे स्पष्टीकरण विजय माल्ल्या यांनी अवघ्या काही तासांपूर्वी ट्विटरवरून दिले असतानाच आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला माल्ल्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ' माल्या काही ठग वा भ्रष्टाचारी नाहीत, ते एक सभ्य व्यक्ती आहेत' असे वक्तव्य अब्दुल्ला यांनी केले.
न२शनल कॉन्फर्नस पक्षाचे प्रमुख आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या अब्दुल्ला यांनी माल्ल्यांचे समर्थने केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ' विजय माल्ल्या यांना अटक कशासाठी करावी? ते सभ्य गृहस्थ आहेत, सरकार जेव्हा त्यांना बोलावेल तेव्हा ते येतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देतील' अस अब्दुल्ला यांनी म्हटले.
मल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात यावी याप्रकरणी याचिका केली होती. मात्र त्यापूर्वीच माल्ल्या देश सोडून गेल्याची माहिती अॅटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती. नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज असलेले माल्ल्या देश सोडून पसार झाल्याचे पडसाद संसदेत उमटले. मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊ देण्यामागे गुन्हेगारी कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर संपुआच्याच काळात मल्ल्या यांना कर्ज देण्यात आल्याचा दावा करीत ते आमच्यासाठी ‘संत’ नाहीत असे सांगत भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले.
या सर्व घमासान घडामोडींचा केंद्रबिंदू असलेले माल्ल्या यांचा मात्र कुठेच पत्ता नव्हता. अखेर आज त्यांनी ट्विवटरवरून आपण देस सोडून फरार झालो नसल्याचे स्पष्ट केले. भारतीय खासदार या नात्याने मी कायद्याचा पूर्ण आदर करतो, आपली न्यायव्यवस्था आदरणीय आहे, असेही त्यांनी म्हटले.
Why should #VijayMallya be arrested? He will come back and answer.He is a Gentleman not a crook-Farooq Abdullah pic.twitter.com/dcIqhafujm
— ANI (@ANI_news) March 11, 2016