मल्ल्याची मालमत्ता : लिलावाचे बँकांना अधिकार, न्यायालयाचा आदेश; कर्जवसुलीसाठी महत्वाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 07:47 AM2021-06-06T07:47:13+5:302021-06-06T07:47:31+5:30
vijay mallya : विजय मल्ल्या यांच्या मालकीचे असलेल्या यूबी सिटी कमर्शिअल टॉवरमधील काही मजले तसेच युनायटेड स्पिरिट्स अँड युनायटेड ब्रिवरीज या कंपन्यांतील शेअर यांची एकत्रित किंमत ५६४६ कोटी रुपये आहे.
नवी दिल्ली : हजारो कोटी रुपयांचा कर्जघोटाळा करून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या काही मालमत्ता, तसेच शेअरचा लिलाव करून त्याद्वारे थकित पैशांची वसुली करण्याचा अधिकार स्टेट बँक ॲाफ इंडियाच्या नेतृत्वाखालील काही बँकांना मिळाला आहे. तसा आदेश विशेष पीएमएलए न्यायालयाने बँकांना १ जून रोजी दिला.
विजय मल्ल्या यांच्या मालकीचे असलेल्या यूबी सिटी कमर्शिअल टॉवरमधील काही मजले तसेच युनायटेड स्पिरिट्स अँड युनायटेड ब्रिवरीज या कंपन्यांतील शेअर यांची एकत्रित किंमत ५६४६ कोटी रुपये आहे. ही मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली होती. या प्रकरणात विजय मल्ल्यावर दाखल केलेल्या खटल्याचे कामकाज पूर्ण न झाल्यास ही सारी मालमत्ता परत करावी असे बँकांकडून लिहून घेण्यात येणार आहे.