विजय माल्या सहेतुक कजर्बुडवे

By admin | Published: September 2, 2014 02:58 AM2014-09-02T02:58:24+5:302014-09-02T02:58:24+5:30

सार्वजनिक क्षेत्रतील युनायडेट बँक ऑफ इंडिया अर्थात युबीआयने किंगफिशर एअरलाईन्स आणि तिचे संस्थापक विजय माल्या यांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित केले आहे.

Vijay Mallya Savatuk Kazirbudde | विजय माल्या सहेतुक कजर्बुडवे

विजय माल्या सहेतुक कजर्बुडवे

Next

 नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रतील युनायडेट बँक ऑफ इंडिया अर्थात युबीआयने किंगफिशर एअरलाईन्स आणि तिचे संस्थापक विजय माल्या यांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित केले आहे. उल्लेखनीय म्हणजे अशा प्रकारची घोषणा करणारी यूबीआय ही देशाच्या सार्वजनिक क्षेत्रतली पहिलीच बँक आहे.

बँकेचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी सांगितले की, ‘आम्ही विजय माल्या व किंगफिशर एअरलाईन्सच्या तीन अन्य संचालकांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित केले आहे.’ बँकेच्या तक्रार निवारण समिती जीआरसीच्या यासंदर्भातील निर्णयात कंपनीचे संचालक रवी नेदुगडी, अनिलकुमार गांगुली आणि सुभाष गुप्ते यांचीही नावे आहेत.
कजर्बुडवे म्हणून घोषित झाल्यानंतर हे लोक आणि कंपनी भविष्यात अन्य बँकांतून कर्ज मिळविण्यास पात्र असणार नाही. त्यांना संचालकपदालाही मुकावे लागेल. एवढेच नाही, तर गरज पडल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो.
नारंग म्हणाले की, योग्य ती कार्यवाही करण्याच्या उद्देशाने जीआरसीच्या या निर्णयाबाबत वित्त मंत्रलय, रिझव्र्ह बँक आणि सेबीला कळविण्यात आले आहे. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका पीठाने युनायटेड बँक ऑफ इंडियाला या प्रकरणी गेल्या आठवडय़ातच कजर्बुडवे म्हणून घोषित करण्यास सूट दिली होती. यानुसार, किंगफिशर एअरलाईन्स व तिच्याशी संबंधित अधिकारप्राप्त व्यक्तींना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सूट दिली होती.
तत्पूर्वी जीआरसीने संचालकांना हजर राहण्यास सांगितले होते; मात्र ते आले नाहीत. याउलट या संचालकांनी वकिलामार्फत एक पत्र पाठवून सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल असून यावर निर्णय होईर्पयत बँक यावर कोणतीही कारवाई करू शकत नसल्याचा दावा केला होता.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4कोलकाता येथे मुख्यालय असलेली यूबीआय ही किंगफिशरचे विजय माल्या व अन्य तीन संचालकांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित करणारी सार्वजनिक क्षेत्रतील पहिली बँक आहे. किंगफिशर एअरलाईन्सचे कामकाज सध्या बंद आहे.
 
4भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय आणि पंजाब नॅशनल बँकेनेही किंगफिशर एअरलाईन्स व तिच्या संचालकांना जाणूनबुजून कर्ज बुडवणारे म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 
4स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली कंसोर्टिअम सदस्य असलेल्या युबीआयने किंगफिशरला सुमारे 35क् कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यामध्ये 17 बँकांचा समावेश असून त्यांना किंगफिशर एअरलाईन्स 4,क्22 कोटी रुपये देणो आहे.

Web Title: Vijay Mallya Savatuk Kazirbudde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.