विजय मल्ल्यांच्या आलिशान एअरबस ए-३१९ चा लिलाव होणार

By admin | Published: April 1, 2016 10:04 AM2016-04-01T10:04:23+5:302016-04-01T10:04:23+5:30

थकलेल्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व्हीस टॅक्स विभागाने विजय मल्ल्या यांचे आलिशान एअरबस ए ३१९ विमानाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

Vijay Mallya's Alisha Airbus A-319 will be auctioned | विजय मल्ल्यांच्या आलिशान एअरबस ए-३१९ चा लिलाव होणार

विजय मल्ल्यांच्या आलिशान एअरबस ए-३१९ चा लिलाव होणार

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - किंगफिशर एअरलाईन्सकडून थकलेल्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व्हीस टॅक्स विभागाने विजय मल्ल्या यांचे आलिशान एअरबस ए ३१९ विमानाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. किंगफिशर एअरलाईन्सने सर्व्हीस टॅक्स विभागाचा आठशे कोटीहून अधिक रक्कमेचा कर थकवला आहे. 
 
या लिलावातून १५० कोटी रुपये मिळतील असा सर्व्हीस टॅक्स विभागाचा अंदाज आहे. १२ मे रोजी या विमानासोबत विमानातीला काही सामनाचाही लिलाव होणार आहे. सर्व्हीस टॅक्स विभागाने डिसेंबर २०१३ मध्ये एअरबस ए ३१९ ताब्यात घेतले होते. 
 
विमानाच्या विक्रीसाठी एअर इंडियाला टेक्निकल सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. योग्य खरेदीदाराने विमानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वी विमानाची साफसफाई, स्वच्छतेची जबाबदारी एअर इंडियाकडे आहे. मल्ल्या यांच्या खासगी वस्तू, त्यांच्या कुटुंबाचा फ्रेम केलेला फोटो अशा काही वस्तू विमानातून काढणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
या विमानाची मालकी सी.जे.लिजिंगकडे (केमॅन) आहे. हे विमान त्यांनी किंगफिशरला भाडयावर दिले आहे. या विमानाच्या लिलावात कायदेशीर अडथळा नसल्याचे मागच्यावर्षी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या विमानाशिवाय मल्ल्यांचे जेट, पाच एटीआर विमाने आणि दोन हॅलिकॉप्टर सर्व्हीस टॅक्स विभागाने जप्त केली आहेत. 
 
 
 

Web Title: Vijay Mallya's Alisha Airbus A-319 will be auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.