विजय मल्ल्यांचा राजीनामा हमीद अन्सारींनी फेटाळला
By admin | Published: May 3, 2016 10:23 PM2016-05-03T22:23:31+5:302016-05-03T22:23:31+5:30
उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिलेला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी दिलेला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. तांत्रिक कारणांमुळे राजीनामा फेटाळल्याचं राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी म्हणाले.
विजय मल्ल्या यांनी काल (सोमवार) परदेशातून पत्रद्वारे राज्यसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र, राजीनाम्याच्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे मल्ल्या यांनी जोडलेली नसल्याची बाब राज्यसभा अध्यक्षांनी पुढे केली आहे. यातल्या कोणत्याही कागदपत्रांवर मल्ल्या यांची स्वाक्षरी नाही, त्यामुळेच राजीनामा फेटाळल्याचं हमीद अन्सारींनी सांगितलं आहे.
विजय मल्ल्या गेल्या 14 वर्षांपासून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीची मुदत 30 जूनला संपत आहे. ईडी आणि बँकांनी दबाव आणल्यामुळे मल्ल्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा शिस्तपालन समितीला राजीनामा सोपवला होता. मात्र राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा आता फेटाळून लावला आहे.