विजय मल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संचालकपदाचा राजीनामा

By admin | Published: March 17, 2016 06:33 PM2016-03-17T18:33:54+5:302016-03-17T18:33:54+5:30

द्योगपती विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (RCSPL) संचालकपदावरुन राजीनामा दिला आहे

Vijay Mallya's resignation as Royal Challengers Bangalore captain | विजय मल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संचालकपदाचा राजीनामा

विजय मल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संचालकपदाचा राजीनामा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १७ - विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (RCSPL) संचालकपदावरुन राजीनामा दिला आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बीसीसीआयला ईमेल पाठवून याबद्दल माहिती दिली आहे. रुसेल ऍडम्स यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलमध्ये असणा-या बीसीसीआयच्या एका अधिका-याला हा ईमेल पाठवण्यात आला आहे. 7 मार्चला हा मेल पाठवण्यात आला आहे. विजय मल्ल्या यांनी देश सोडल्याच्या पाच दिवसानंतर हा मेल पाठवण्यात आला.
 
'आम्हाला रुसेल ऍडम्स जे आता आरसीबी संघाचे प्रमुख असणार आहेत त्यांच्याकडून ईमेल मिळाला आहे. विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदावरुन राजीनामा दिल्याची माहिती या मेलमध्ये देण्यात आली आहे. तसंच त्यांचा मुलगा सिद्दार्थ मल्ल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असेपर्यंत विजय मल्ल्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून असतील अशी माहितीदेखील मेलमधून दिल्याचं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे. 

Web Title: Vijay Mallya's resignation as Royal Challengers Bangalore captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.