गुजरातचे नवे मुख्यमंत्री होणार विजय रुपानी
By admin | Published: August 5, 2016 06:16 PM2016-08-05T18:16:14+5:302016-08-05T18:57:44+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ०५ - गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदावरुन पायउतार होण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा केले काही दिवस चालू होती. मात्र, आज भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले. तर, उपमुख्यमंत्री पद नितीन पटेल यांना देण्यात येणार असून उद्या ७ ऑगस्टला शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापूर्वी आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट टाकली होती.