कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर!
By स्वदेश घाणेकर | Published: December 3, 2020 03:17 PM2020-12-03T15:17:24+5:302020-12-03T15:22:44+5:30
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली.
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्वीट तिने केले आणि काही वेळात तिने हे ट्वीट डिलीटही केले. पण तोपर्यंत या ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. यावरून कंगना जबरदस्त ट्रोल झाली.आता सिंगर व अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनाच्या या ट्वीटवर सणसणीत प्रतिक्रिया दिली. पण, यानंतर कंगनानं दिलजीत दोसांज ( Diljit Dosanjh) याला करण जोहर के पालतू असे म्हटले आणि त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सर विजेंदर सिंग ( Vijender Singh) यानेही उडी मारली.
दिलजीतने संबंधित शेतकरी महिलेचा व्हिडीओ पोस्ट करत कंगनाला चांगलेच सुनावले. ‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’असे या पोस्टसोबत दिलजीतने लिहिले. त्यावर कंगनानं उत्तर दिले की,''ओह करन जोहर के पालतू... जी आजी शाहीन बाग येथे नागरिकत्वासाठी आंदोलन करत होती तिच बिलकीस बानो आजी शेतकऱ्यांच्या आंदोलनात दिसली. महिंदर कौर जी यांना तर मी ओळखतही नाही. तुम्ही लोकांनी काय ड्रामा सुरू केला आहे? आताच्या आता हे थांबवा.''
Ooo Karan johar ke paltu, jo dadi Saheen Baag mein apni citizenship keliye protest kar rahi thi wohi Bilkis Bano dadi ji Farmers ke MSP ke liye bhi protest karti hue dikhi. Mahinder Kaur ji ko toh main janti bhi nahin. Kya drama chalaya hai tum logon ne? Stop this right now. https://t.co/RkXRVKfXV1
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020
त्यावर २००८च्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा आणि सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या विजेंदर सिंगनं प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, गलत पंगा ले लिया बहन..
Galat panga le liya bhen 👊🏽 https://t.co/MK687zEKOL
— Vijender Singh (@boxervijender) December 3, 2020
त्यावर, तू पण शिवसेना तयार करतोस का... भावा? असा टोला कंगनान मारला.
Kyun tu bhi Shiv sena banayega ..... bhai?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 3, 2020
विजेंदरनं त्यावर प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, ती तर तयार झालीच आहे आणि चांगल काम करत आहे.
Wo to ban rakhi hai or kaam bhi acha hi ker rahi hai 😊
— Vijender Singh (@boxervijender) December 3, 2020
काय होते कंगनाचे ट्विट?
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कौर या 87 वर्षांच्या आहेत. याच आजीची तुलना कंगनाने शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादीसोबत केली होती. ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे,’ असे ट्वीट कंगनाने केले होते. यानंतर सोशल मीडियावरून कंगानाचा विरोध होऊ लागला होता. ट्रोल होताच कंगनाने हे ट्वीट डिलीट केले होते.
आजीनेही दिले उत्तर
कंगनाने भलेही ट्वीट डिलीट केले. पण म्हणून टीका कमी झाली नाही. महिंदर कौर यांनीही कंगनाला खरपूस शब्दांत उत्तर दिले. ‘माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे तुझ्याकडे (कंगना) काम नसेल तर तुच माझ्या शेतात मजुरीला ये,’ अशा शब्दांत या आजीने कंगनाला सुनावले.