आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 09:43 AM2024-07-23T09:43:34+5:302024-07-23T09:47:15+5:30

गेल्या काही दिवसापासून आयएएस पूजा खेडकर चर्चेत आहेत, त्यांच्या पोस्टींग आणि निकालावरुन त्या वादात सापडल्या आहेत. या वादावर आता विकास दिव्यकीर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vikas Divyakirthi reacts on IAS Pooja Khedkar controversy inner side of OBC-EWS reservation is told | आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली

आयएएस पूजा खेडकर वादावर विकास दिव्यकीर्तींनी दिली प्रतिक्रिया; OBC-EWS आरक्षणातील आतली बाजूच सांगितली

गेल्या काही दिवसापासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. त्यांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, अपंग कोटा आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यावर आता विकास दिव्यकीर्ती यांनी युपीएससी उमेदवार ओबीसी आणि EWS आरक्षणाचा अवाजवी फायदा कसा घेतात यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तब्बल अडीच तास त्यांनी माझा आवाज दाबला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप

विकास दिव्यकीर्ती यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला मुलाख दिली. यावेळी त्यांनी स्पर्धा परिक्षांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पूजा खेडकर यांच्याबाबतीतही सविस्तर सांगितले. विकास दिव्यकीर्ती म्हणाले, "मला वाटत नाही की १० किंवा २० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार अशा पार्श्वभूमीतून आले आहेत ज्यांना EWS आरक्षणाची खूप गरज आहे. " मी सरकारच्या हेतूवर शंका घेत नाही, पण हे लोक कसे काम करत आहेत हे मला माहीत नाही की लोक तुमच्या धोरणाची खिल्ली उडवत आहेत आणि तुम्हाला त्याची जाणीवही नाही, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले.

विकास दिव्यकिर्तीच्या म्हणाले, ओबीसी-ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये इतकी गुंतागुंत आहे की, ज्यांना त्याबद्दल माहिती नाही ते ऐकून थक्क होतील. OBC मध्ये क्रिमीलेयर ही संकल्पना असली तरी EWS ची अवस्था अशी आहे की ती कोणीही घेऊ शकेल.

ओबीसी आरक्षण कोणाला मिळणार?

ज्या उमेदवाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्न मोजले जात नाही.

पालक C-D गटात असतील तर उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त असले तरी आरक्षण मिळेल.

विकास दिव्यकीर्ती म्हणाले, “मी अनेक UPSC उमेदवारांना ओळखतो ज्यांचे OBC फायदे आहेत, ज्यांचे कुटुंबातील आई किंवा वडील 'अ' गटात नोकरी करत होते. योगायोगाने त्यांचा मुलगा किंवा मुलगी अभ्यासात चांगले आहेत.

"मुलाला वाटले की त्याला यूपीएससीची परीक्षा द्यावी लागेल आणि त्याला ओबीसी आरक्षणाचा लाभही घ्यावा लागेल, म्हणून वडिलांनी नोकरीचा राजीनामा दिला. आपली सर्व मालमत्ता आपल्या मुलाला भेट म्हणून दिली. आता वडिलांमुळे ‘अ’ गटाची नोकरी किंवा आठ लाखांहून अधिकची मालमत्ता अडकणार नाही. आता मुलाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, कारण आयोग उमेदवाराच्या उत्पन्नावर नाही तर पालकांच्या उत्पन्नाकडे पाहतो, असंही विकास दिव्यकीर्ती म्हणाले. 

EWS मध्ये कोणाला लाभ मिळेल?

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे. फक्त एक वर्षाचे उत्पन्न पाहिले जाते.

कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि भावंड आणि १८ वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले यांचा समावेश.

घर १००० फुटांपेक्षा जास्त नसावे. अधिसूचित फ्लॅट १०० यार्डांपेक्षा जास्त नसावा आणि अन-अधिसूचित २०० यार्डांपेक्षा जास्त नसावा.

विकास दिव्यकिर्ती यांच्या मते, EWS आरक्षणामध्येही खूप खेळ सुरू आहे. EWS आरक्षणासाठी, संपूर्ण कुटुंबाचे फक्त एक वर्षाचे उत्पन्न विचारात घेतले जाते. मी अनेक कुटुंबांना ओळखतो ज्यांनी ४.९ एकरपेक्षा जास्त जमीन विकली. कमी फूट दाखवून फ्लॅटची नोंदणी करून घेतली आहे. 

आई-वडील दोघेही कमावत असतील तर एक व्यक्ती वर्षभर पगाराशिवाय रजेवर जाते. अशा प्रकारे, जेव्हा जेव्हा EWS कोट्याचा लाभ घ्यायचा असतो, तेव्हा मागील एका वर्षाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी होते.

Web Title: Vikas Divyakirthi reacts on IAS Pooja Khedkar controversy inner side of OBC-EWS reservation is told

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.