Vikas Dubey Encounter: विकास दुबे कानपूरला पोहोचणार नाही हीच अपेक्षा; 'त्या' व्हिडीओ क्लिपनं एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:15 PM2020-07-10T12:15:31+5:302020-07-10T12:16:44+5:30
Vikas Dubey Encounter: विकास दुबेच्या एन्काऊंटरबद्दलचा संशय वाढला
कानपूर: आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या कारला भौती परिसरात अपघात झाला. त्यानंतर त्यानं एका पोलिसाचं पिस्तुल हिसकावलं आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र विकासनं नकार दिला. यानंतर झालेल्या चकमकीत विकासचा खात्मा करण्यात आला.
विकास दुबेचा एन्काऊंटर नियोजित होता का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिसांनी एन्काऊंटरची योजना आधीच आधली होती आणि आज सकाळी ती अंमलात आणली गेली का, असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. हा संशय आणखी वाढवणारी एक व्हिडीओ क्लिप आता समोर आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी 'विकास दुबे कानपूरला सुरक्षित पोहोचणारच नाही, अशी अपेक्षा करू', असं म्हणताना दिसत आहेत. हे अधिकारी उज्जैनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचं म्हटलं जातं आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीनं हे वृत्त दिलं आहे.
विकास दुबे कानपूरला पोहोचेल ना?, असा प्रश्न एक पोलीस कर्मचारी विचारतो. त्यावर दुसरा अधिकारी हसत हसत 'अपेक्षा आहे की तो पोहोचू नये,' असं उत्तर देतो. या व्हिडीओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. विकास दुबेला काल मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून अटक करण्यात आली. गेल्या सहा दिवसांपासून उत्तर प्रदेश त्याचा शोध घेत होते. त्याला उज्जैनमधून कानपूरला आणलं जातं होतं. त्यावेळी पोलिसांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला विकास एन्काऊंटरमध्ये मारला गेला.
एन्काऊंटरबद्दल संशय वाढला
विकास दुबेच्या एन्काऊंटरच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी घडलेल्या घडामोडी संशयास्पद आहेत. कानपूरच्या भौती भागात रस्त्याशेजारी विकासचा एन्काऊंटर झाला. विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला आणलं जात असताना पोलिसांच्या ताफ्यापाठोपाठ माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यादेखील होत्या. मात्र त्यांच्या गाड्या रस्त्यावर अचानक थांबवण्यात आल्या. विशेष म्हणजे गाड्या रोखण्यात आलेल्या भागापासून पुढे काही अंतरावर विकासचा एन्काऊंटर झाला.
माध्यम प्रतिनिधींच्या गाड्या रोखण्यात आल्यानंतर पोलिसांचा ताफा पुढे गेला. त्यानंतर पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. पोलिसांनी माध्यमांच्या गाड्या रोखल्याचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. कानपूरच्या सचेंडी भागात पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यांना रोखलं. या गाड्यांसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले. कानपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. त्यांनी संपूर्ण रस्ताच रोखून धरला. सकाळी साडे सहाच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.
विकास दुबेचा एन्काऊंटर स्क्रिप्टेड? गाडीला अपघात होण्याआधीचा VIDEO समोर; संशय वाढला
शेवटच्या चौकशीत विकास दुबेनं दिली मोठी कबुली; उत्तर प्रदेश पोलीस गोत्यात येणार?
आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार
लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं
गाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरार
गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य