Vikas Dubey Encounter: गाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 09:11 AM2020-07-10T09:11:45+5:302020-07-10T09:16:48+5:30
Vikas Dubey Encounter: विकासला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात
लखनऊ: कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास पोलिसांकडून गुंगारा देत होता. संपूर्ण उत्तर प्रदेशात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला होता. अखेर काल मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून त्याला अटक झाली.
एसटीएफच्या गाडीमधून पोलीस विकासला कानपूरला नेत होते. त्यावेळी गाडीला अपघात झाला. त्यानंतर विकासनं पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक सुरू झाली. त्यात विकाससह काही पोलीसदेखील जखमी झाले. त्यांना कानपूरमधल्या लाला लजपत राय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. साडे सहाच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला.
Kanpur: Gangster Vikas Dubey has been killed in police encounter in Kanpur. According to police, he tried to flee by snatching pistol of the injured policemen after car overturned. Police had tried to make him surrender. pic.twitter.com/PfRq0f0eBe
— ANI UP (@ANINewsUP) July 10, 2020
गाडीचा अपघात पाहून काही लोक घटनास्थळी पोहोचले. मात्र गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानं ते तिथून निघून गेले. पोलिसांची कार अतिशय वेगात असल्यानं तिला अपघात झाल्याचं सांगितलं जातं आहे. एन्काऊंटर आणि अपघातात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
#WATCH Vikas Dubey attempted to flee by snatching pistol of the injured policemen after car overturned. Police tried to make him surrender, during which he fired at the policemen. He was injured in retaliatory firing by police. He was later rushed to the hospital: SP Kanpur West pic.twitter.com/ZajJVLNGBU
— ANI UP (@ANINewsUP) July 10, 2020
कसा पकडला विकास दुबे?
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली. एका सुरक्षा रक्षकानं विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. विशेष म्हणजे त्याआधी विकास दुबे त्या परिसरात फोटो काढत होता. पोलिसांनी अटक केल्यावरही विकासच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नव्हता. विकास दुबेची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना तिथे काही लोक गोळा झाले होते. त्यांना पाहून तो 'होय, मीच विकास दुबे, कानपूरवाला' असं ओरडलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी विकासला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं.