कौतुकास्पद! एका रुपयात इडली विकणार्या अम्माला शेफ विकास खन्नांचं सरप्राईज गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 01:31 PM2020-05-16T13:31:38+5:302020-05-16T13:46:15+5:30
अम्मांना असं वाटतं की, कोणताही माणूस भुकेलेला राहू नये.
गेल्या 30-35 वर्षांपासून कमलाथल अम्मा (वय 85) केवळ 1 रुपयात इडली विकून लोकांचे पोट भरत आहे. इतकेच नव्हे तर तामिळनाडूच्या या अम्मांनी लॉकडाऊनमध्येही इडलीच्या किमती वाढविल्या नाहीत. त्या दररोज उत्साहात लोकांना इडली पोहोचवतात आणि त्यांना खायला घालतात. अम्मांना असं वाटतं की, कोणताही माणूस भुकेलेला राहू नये.
जेव्हा सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांना अम्माच्या या उदात्तकार्याची माहिती मिळाली, त्यानंतर विकास खन्ना यांनी ट्विटरद्वारे कमलाथल अम्माबद्दल माहिती गोळा केली. विकास खन्ना यांनी ट्विटरवर कोइम्बतूरमधील कमलाथल अम्मांची कुणी मला माहिती देऊ शकेल का, असं आवाहन केलं, त्यालाही अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्याकडे 350 किलो तांदूळ आहे. कोणीतरी त्यांच्याशी समन्वय साधण्यास मदत करावी. खरं तर विकास खन्नाला अम्माकडे 350 किलो तांदूळ पोहोचवायचे होते.
विकास खन्ना यांच्या ट्विटनंतर अनेक लोक त्यांची मदत करण्यासाठी पुढे आले आणि शेफ यांना अम्मांपर्यंत तांदूळ पोहोचवता आले. विकास खन्ना एका ट्विटमध्ये लिहितात, आज आम्ही त्यांना आश्चर्यचकित केले. मदर्स डे च्या शुभेच्छा
विकास खन्ना यांनी यापूर्वीच भारतातल्या 75 शहरांमध्ये 2.5 दशलक्ष रेशन वितरीत केलं आहे. अम्मांबद्दल बोलायचे झाल्यास विकास खन्नाच नव्हे, तर आनंद महिंद्रासुद्धा त्यांच्या कार्यानं खूप प्रभावित झाले आहेत. अम्मांचे प्रयत्न पाहून त्यांनी त्यांच्यापर्यंत गॅस व सिलिंडरही पोहोचवले आहेत. जेव्हा आपण नि:स्वार्थीपणाने काही चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सगळेच आपल्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. याशिवाय विकास खन्नाने तातडीने अम्माला मदत करण्याचा निर्णय घेतला हीदेखील कौतुकास्पद बाब आहे.Can someone-anyone connect me to K Kamalathal, Coimbatore, Tamil Nadu?
— Vikas Khanna (@TheVikasKhanna) May 9, 2020
I have 350 Kgs Rice secured near Chennai.
Someone can help me coordinate.
And tell her - Happy Mothers Day and I LOVE HER. https://t.co/TcUjeRJH67pic.twitter.com/jZ74v28M9q
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या निःस्वार्थ सेवेला भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं सलाम ठोकला होता. तामिळनाडूच्या के कमलथाल हा आजी मागील 30 वर्ष केवळ 1 रुपयात इडली विकत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग बंद झाले असतानाही आर्थिक नुकसान सहन करत आजींनी मजुरांसाठी इडली विकण्याचं काम सुरूच ठेवलं आहे. कैफनं के कमलथाल यांचा फोटो शेअर करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.Good Morning.
— Vikas Khanna (@TheVikasKhanna) May 10, 2020
Im trying to write this without breaking down.
Ive been HUGE fan of K Kamalathal,Coimbatore,Tamil Nadu since @anandmahindra ji wrote ab her.
A few days back she said that "No One Should Go Hungry: Despite Lockdown & Losses, 80-YO Refuses To Hike Idli Price Of Re 1 pic.twitter.com/xxG7p5xgtp
अन्य महत्त्वाच्या बातम्या
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा
Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?
CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ
अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार
प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू
...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला