या गावात रात्री होत नाहीत विवाह
By admin | Published: April 19, 2017 01:58 AM2017-04-19T01:58:42+5:302017-04-19T01:58:42+5:30
या गावात रात्रीचे लग्न आता होत नाहीत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादजवळच्या अटौर गावात कुठलीही परंपरा नाही किंवा प्रथाही नाही,
गाझियाबाद : या गावात रात्रीचे लग्न आता होत नाहीत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादजवळच्या अटौर गावात कुठलीही परंपरा नाही किंवा प्रथाही नाही, पण गावातील लोकांच्या निर्णयामुळेच आता येथे रात्री लग्न होत नाहीत. गावातील एक ज्येष्ठ नागरिक वेदपाल यांनी सांगितले की, २० वर्षांपूर्वी येथे रात्रीचे लग्न होत असत, पण गावात वीज नसल्यामुळे जनरेटरचा खर्च वाढत होता. जनरेटरचा धूर आणि आवाज याचाही त्रास होत होता. त्यामुळे गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला की, गावात केवळ दिवसाच विवाह समारंभ करायचे. परिणामी, वऱ्हाडींसाठी रात्री व्यवस्था करण्याचा प्रश्नही निकाली निघाला. मद्यपान करून रात्रीचा गोंधळ करणाऱ्यांचाही बंदोबस्त झाला. असे अनेक फायदे या निर्णयाने झाले. आता इथे लग्न असले, तर सकाळीच वऱ्हाडी येतात आणि दिवसभरात लग्नाचे विधी आटोपून सायंकाळपर्यंत सारे वऱ्हाडी आपापल्या गावी आणि घरी निघूून जातात. यामुळे प्रदूषणाचा प्रश्नही सुटलाच आहे.