साधा सर्दी-खोकला असला तरी कोरोना झाल्याचं सांगायचा डॉक्टर, नातेवाईकांनी धु धु धुतलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:15 PM2021-05-26T16:15:10+5:302021-05-26T16:15:30+5:30

रुग्णाला साधा सर्दी आणि खोकला होता. डॉक्टरनं फक्त हात लावून तपासलं आणि रुग्णाला कोरोना झाल्याचं सांगितलं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा पारा चढला आणि डॉक्टरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

Villagers Doctor Beaten Describe Cold Cough As Corona Virus In Firozabad | साधा सर्दी-खोकला असला तरी कोरोना झाल्याचं सांगायचा डॉक्टर, नातेवाईकांनी धु धु धुतलं!

साधा सर्दी-खोकला असला तरी कोरोना झाल्याचं सांगायचा डॉक्टर, नातेवाईकांनी धु धु धुतलं!

googlenewsNext

रुग्णाला साधा सर्दी आणि खोकला होता. डॉक्टरनं फक्त हात लावून तपासलं आणि रुग्णाला कोरोना झाल्याचं सांगितलं. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा पारा चढला आणि डॉक्टरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांना या झोलझाल डॉक्टरला इतकं मारलं की त्यालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. 

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथील ही घटना आहे. येथील एक राकेश नावाचा डॉक्टर कोणत्याही डीग्रीविना गावातील लोकांवर उपचार करत असल्याचं उघडकीस आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी नगला जवाहर येथील एका गावकऱ्यानं त्याच्या वडिलांना सर्दी-खोकला झाल्याचं सांगितलं आणि तपासणीसाठी डॉक्टरला घरी बोलावलं. कथित डॉक्टरनं रुग्णाची कोणतीही तपासणी न करताच त्याला कोरोना झाल्याचं घोषीत करुन टाकलं. याच गोष्टीवर नाराज झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी राकेश नावाच्या कथित डॉक्टरला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

डोक्यावर जबर मारहाण झाल्यामुळे राकेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. संपूर्ण घटना जाणून घेण्यासाठी पोलीस गावात पोहोचले असता डॉक्टर गावातील नागरिकांना कोरोनाची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पैसे दिले नाहीत, तर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला याची माहिती देऊन कोरोना वॉर्डात १४ दिवसांच्या आयसोलेशनसाठी पाठवून देईन, अशी धमकी डॉक्टर देत होता, असाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी केली जात असल्याचं सांगितलं आहे. तर स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांनी अशा झोलझाल करणाऱ्या डॉक्टरांमुळे कोरोना संदर्भात नागरिकांमध्ये भीती पसरत असून अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी मोहिम हाती घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.   
 

Web Title: Villagers Doctor Beaten Describe Cold Cough As Corona Virus In Firozabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.