खोटे दाखले, ठराव करून दारू दुकानास परवानगी वावडदा येथे ग्रामस्थांचा आक्षेप : ग्रामसेवक, सदस्यांवर आरोप
By admin | Published: April 5, 2016 12:13 AM2016-04-05T00:13:46+5:302016-04-05T00:13:46+5:30
जळगाव- वावडदा ता.जळगाव येथे ग्रामसेवक, ग्रा.पं.च्या सदस्यांनी खोटे दाखले व खोटे ठराव करून गावात देशी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. हे दारूचे दुकान गावात आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यास पोलीस प्रशासन व जि.प.तील संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, अशी तक्रार ग्रामस्थांनी जि.प. व पोलिसांकडे केली आहे.
Next
ज गाव- वावडदा ता.जळगाव येथे ग्रामसेवक, ग्रा.पं.च्या सदस्यांनी खोटे दाखले व खोटे ठराव करून गावात देशी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. हे दारूचे दुकान गावात आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यास पोलीस प्रशासन व जि.प.तील संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, अशी तक्रार ग्रामस्थांनी जि.प. व पोलिसांकडे केली आहे. त्याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, २६ जानेवारी रोजी गावात ग्रामसभा झाली होती त्यात गावाचा विकास व म्हसावद सामूहिक पाणी योजनेतून गाव वगळण्याची चर्चा झाली. इतर कुठलेही विषय नव्हते. परंतु ग्रामसेवक व ग्रामपंचातीच्या कार्यकारिणीने संगनमत करून गावात किरकोळ देशी दारू विक्री करण्याचे दुकान आणण्याचा घाट रचला. तसा ठराव केेला. ठराव करताना गावात एकही देशी दारूचे दुकान नाही व देशी दारूचे दुकान आले तर महसूल वाढेल, असेही म्हटले आहे. ग्रामसभेसमोर तसा कुठलाही विषय झालेला नसताना खोटे नमूद करून ग्रा.पं.ने वावडदा ग्रामस्थांची फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे. गावात देशी दारूचे दुकान सुरू झाले तर गावातील भावी पिढीचे नुकसान होईल. अनेकांना त्रास होईल व पुढे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्नही निर्माण होईल, असेही म्हटले आहे. निवेदनावर राजेंद्र चव्हाण, किशोर पवार, गजानन न्हायदे, जितेंद्र रोजपूत, ईश्वर येवले, ज्ञानेश्वर गोपाळ, ज्ञानेश्वर पाटील, ईश्वर देवरे, रवींद्र गोपाळ आदी ४९ ग्रामस्थांच्या सा आहेत.