रामिष्टेंची युनियन विलासकाका उंडाळकरांच्या पाठीशी
By admin | Published: September 26, 2014 01:57 AM2014-09-26T01:57:25+5:302014-09-26T01:57:25+5:30
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माथाडींच्या घरांचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले
नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माथाडींच्या घरांचा प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विधानसभा निवडणुकीत विलासकाका उंडाळकर यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन माथाडी नेते बाबूराव रामिष्टे यांनी केले आहे.
अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी रामिष्टे म्हणाले की, वडाळा व चेंबूरमध्ये शासनाने कामगारांच्या घरांसाठी ५८ एकर जागा दिली आहे. या ठिकाणी ५ हजार घरे बांधण्यासाठी २००६ मध्ये शुभारंभ झाला आहे. परंतु काही अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला आहे. कामगारांना स्वस्त घरे देण्यासाठी काही घरे बाहेरील व्यक्तींना देण्यास संमती द्यावी व इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु अडीच वर्षांत त्यांनी याविषयी कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे माथाडी कामगार नाराज आहेत, असे रामिष्टे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)