पाकच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले गावकरीही शहीदच

By admin | Published: August 26, 2015 12:43 PM2015-08-26T12:43:51+5:302015-08-26T14:40:48+5:30

सीमेपलीकडून गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले गावकरीही शहीदच आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

The villagers who died in the firing were also martyred | पाकच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले गावकरीही शहीदच

पाकच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले गावकरीही शहीदच

Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २६ -  वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले गावकरीही शहीदच आहेत असे सांगत सरकारने त्यांनाही योग्य भरपाई द्यायला हवी असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आजपासून तीन दिवसांच्या काश्मीर दौ-यावर असलेल्या राहुल यांनी आज सकाळी बालकोटा येथे जाऊन काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले सरपंच व अन्य गावक-यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
' सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबार यामुळे येथील लोक सतत चिंता व भीतीच्या सावटाखाली जगत असतात. पाकिस्तानी जवानांच्या गोळीबारामुळे मृत्यूमुखी पडणारे हे गावकरीही शहीदच आहेत, त्यामुळे सरकारकडून त्यांना त्याच दर्जाची भरपाई मिळावी. तसेच या नागरिकांना पिकांसाठी विमाही मिळायला हवा. आणि गोळीबारापासून गावक-यांचे संरक्षण व्हावे म्हणून सरकारने त्यांच्यासाठी बंकर्सची व्यवस्था करावी अशी मागणी राहुल यांनी यावेळी केली.

 

Web Title: The villagers who died in the firing were also martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.