विनायक सोनवणे खून खटल्यात तिघांना जन्मठेप न्यायालयाचा निकाल : दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी

By admin | Published: December 5, 2015 11:50 PM2015-12-05T23:50:53+5:302015-12-05T23:50:53+5:30

जळगाव: शिव कॉलनीतील रहिवासी तथा नगरसेवक विनायक काशीनाथ सोनवणे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी राजहंस उर्फ नाना सुकलाल सूर्यवंशी, त्यांचा मुलगा पवन तसेच अमर सोनवणे या तिघांना शनिवारी न्या.एम.ए.लव्हेकर यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अमर याला कलम ११४ सह ३०२ अन्वये दोषी धरण्यात आले आहे.

Vinayak Sonawane murder case: Three life sentences for life imprisonment: Six months in jail for failing to pay penalty | विनायक सोनवणे खून खटल्यात तिघांना जन्मठेप न्यायालयाचा निकाल : दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी

विनायक सोनवणे खून खटल्यात तिघांना जन्मठेप न्यायालयाचा निकाल : दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी

Next
गाव: शिव कॉलनीतील रहिवासी तथा नगरसेवक विनायक काशीनाथ सोनवणे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी राजहंस उर्फ नाना सुकलाल सूर्यवंशी, त्यांचा मुलगा पवन तसेच अमर सोनवणे या तिघांना शनिवारी न्या.एम.ए.लव्हेकर यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अमर याला कलम ११४ सह ३०२ अन्वये दोषी धरण्यात आले आहे.
१८ डिसेंबर २०१२ रोजी दुपारी १२.४५ वाजता विनायक सोनवणे यांचा मणियार विधी महाविद्यालयासमोर खून झाला होता. याबाबत शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ मार्च २०१३ रोजी तपासाधिकारी वाय.डी.पाटील यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारपक्षातर्फे ३० साक्षीदार तपासण्यात आले. सरकार व बचाव पक्षाच्या वतीने चार ते पाच सत्रात युक्तीवाद झाला. तसेच दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवादही सादर झाला होता. या गुन्‘ातील तिन्ही आरोपी घटना घडल्याच्या दिवसापासून कारागृहात आहेत. सरकारतर्फे ॲड.गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.बी.के.शिंदे यांनी सहकार्य केले तर आरोपीच्यावतीने ॲड.सुशील अत्रे यांनी काम पाहिले.या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


खूनाचे कारण
शिवकॉलनी भागातील नाना उर्फ राजहंस यांचा मुलगा हर्षल याचे शिव कॉलनीतील नगरसेवक विनायक सोनवणे यांच्यासोबत भांडण झाले होते. या भांडणात हर्षल याच्या डोळ्याला इजा होऊन तो कायमस्वरूपी निकामी झाला होता. हर्षल याचा डोळा निकामी होण्यासाठी विनायक सोनवणे हे जबाबदार असल्याचा राग नाना सूर्यवंशी यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी विनायक सोनवणे यांचा खून केला होता.

Web Title: Vinayak Sonawane murder case: Three life sentences for life imprisonment: Six months in jail for failing to pay penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.