सोशल मीडिया पोस्टनं बंगळुरू पेटलं; पोलिसांच्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू; ६० पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:16 AM2020-08-12T05:16:05+5:302020-08-12T07:21:57+5:30
काँग्रेस आमदाराच्या घरावर जमावाकडून दगडफेक; परिसरात जाळपोळीचीही घटना
बंगळुरू: एका सोशल मीडिया पोस्टवरून कर्नाटकची राजधानी बंगळुरूत हिंसाचार झाला आहे. जमावानं काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला केला. जमावातल्या काही जणांनी मूर्तींच्या घरावर दगडफेक केली. यावेळी परिसरात आग लावण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरदेखील जमावानं हल्ला केला. त्यात ६० पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Around 60 police personnel including an Additional Commissioner of Police injured in clashes that broke out over an alleged inciting social media post, in DJ Halli & KG Halli police station areas of Bengaluru, Karnataka: Police Commissioner Kamal Pant pic.twitter.com/WHp8WAbJct
— ANI (@ANI) August 11, 2020
काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टनं बंगळुरूत वादंग माजला आहे. रात्रीच्या सुमारास जमावानं मूर्तींच्या घरावर दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस मूर्तींच्या घराजवळ पोहोचले. त्यामुळे जमावानं पोलिसांवरही हल्ला केला. याशिवाय जाळपोळदेखील केली. जमाव प्रक्षुब्ध झाल्यानं पोलिसांनी गोळीबार केला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बंगळुरू शहराचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.
Karnataka: Visuals from Bengaluru's DJ Halli Police Station area where violence broke out over an alleged inciting social media post.
— ANI (@ANI) August 11, 2020
Two people died & around 60 police personnel sustained injuries in the violence in Bengaluru, according to Police Commissioner Kamal Pant. pic.twitter.com/QsAALZycs0
30 people have been arrested in connection with the violence that broke out over an alleged inciting social media post, in Bengaluru. More arrests are being made: Sandeep Patil, Joint Commissioner of Police (Crime) Bengaluru (file photo) #Karnatakahttps://t.co/kJDDwGRI3Opic.twitter.com/ESDVKuqplT
— ANI (@ANI) August 11, 2020
जमावानं श्रीनिवास मूर्तींच्या घरासोबतच बंगळुरू पूर्वेला असलेल्या के. जे. हाली पोलीस ठाण्यावरही हल्ला केला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. यानंतर परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली.