मणिपूरमध्ये वाहतूक सुरू झाल्यानंतर हिंसाचार उसळला, आज बंदची घोषणा; २४ तासांत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:37 IST2025-03-09T11:36:48+5:302025-03-09T11:37:37+5:30
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाल्याचे समोर आले आहे.

मणिपूरमध्ये वाहतूक सुरू झाल्यानंतर हिंसाचार उसळला, आज बंदची घोषणा; २४ तासांत एकाचा मृत्यू, अनेक जखमी
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाल्याचे समोर आले आहे. हिंसाचारामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी हिंसाचारग्रस्त कांगपोकपी जिल्ह्यात परिस्थिती शांत राहिली, पण लोकांमध्ये अजूनही तणाव दिसून येत आहे.
आज कुकी-ज्यू समुहांनी सुरक्षा दलांच्या कारवाईविरोधात अनिश्चित काळासाठी बंदची हाक दिली आहे, यामुळे राज्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
आज कांगपोकपी जिल्ह्यात शांततेचे वातावरण आहे, पण तणावाचे वातावरण अजूनही कायम आहे. शनिवारी कांगपोकपी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात एका निदर्शकाचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हाणामारीत महिला आणि पोलिसांसह ४० हून अधिक लोक जखमी झाले.
पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर कुकीबहुल जिल्ह्यात निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरू झाला. हे निदर्शन वाहतुकीला परवानगी देण्याच्या विरोधात आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग-२ वरील गमघीफियाई आणि जिल्ह्यातील इतर भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहनांची गस्त घातली जात आहे.
निदर्शकांनी लष्करी जवानांवर गोफणीचा वापर केला आणि शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा दलांशी चकमक सुरू होती. सुरक्षा दलांच्या किमान पाच वाहनांच्या खिडक्या तुटल्या आहेत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले.