‘आयफाेन’च्या उत्पादक कर्मचाऱ्यांचे आंदाेलन; कारखान्यात काम ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 02:06 AM2020-12-14T02:06:00+5:302020-12-14T07:04:21+5:30

पगारकपातीवरून वाढता असंताेष

violence breaks out at wistron corps iphone manufacturing plant near bengaluru | ‘आयफाेन’च्या उत्पादक कर्मचाऱ्यांचे आंदाेलन; कारखान्यात काम ठप्प

‘आयफाेन’च्या उत्पादक कर्मचाऱ्यांचे आंदाेलन; कारखान्यात काम ठप्प

Next

बंगळुरू : काेराेना लाॅकडाऊनमुळे वेतनात कपात केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी ‘आयफाेन’चे उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये आंदाेलन केले. त्यामुळे काही दिवसांसाठी कामबंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.  

मूळची तैवान येथील ‘विन्स्ट्राॅन इन्फाेकाॅम’ ही कंपनी बंगळुरूजवळच्या नरसापूर येथे ‘ॲपल’च्या ‘आयफाेन’ आणि इतर उपकरणांचे उत्पादन करते. कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार पगार न दिल्याचा आराेप करत कर्मचाऱ्यांनी अचानक तीव्र आंदाेलन केले. कंपनीच्या आवारात ताेडफाेड आणि वाहनांची जाळपाेळही केली. वेतनातून सुमारे ७ ते ९ हजार रुपयांची कपात करण्यात येत असून, ताे पगारही वेळेवर मिळत नसल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी केला आहे. घटनास्थळी गेलेल्या पाेलिसांवरही हल्ला करण्यात आला हाेता. या घटनेची माहिती मिळताच, पाेलीस उपायुक्त सी. सत्यभामा यांनी घटनास्थळी धाव घेतली. कामगारांमध्ये असंताेष असल्याचे यापूर्वी काेणीही निदर्शनास आणून दिले नव्हते. कामगार विभागालाही याची माहिती नव्हती, असे त्यांनी सांगितले. 

कर्नाटकमध्येही वाढता असंतोष
कामगारांमध्ये असंताेष वाढत असल्याच्या घटना कर्नाटकमध्ये वाढल्या आहेत. गेल्याच महिन्यात टाेयाेटा किर्लाेस्कर कंपनीच्या कारखान्यातही संप पुकारण्यात आला असून, या ठिकाणी अद्यापही काम बंदच आहे. 

विस्ताराची याेजना 
या ठिकाणी सुमारे ३,००० कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी ६८० काेटींची गुंतवणूक करून कंपनी सुरू करण्यात आली हाेती. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३,००० काेटी रुपये गुंतवण्याची कंपनीची याेजना आहे. त्यातून सुमारे ९ हजार जणांना राेजगार मिळणे अपेक्षित आहे.

Web Title: violence breaks out at wistron corps iphone manufacturing plant near bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.