मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 03:39 PM2024-09-07T15:39:30+5:302024-09-07T15:41:34+5:30

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. दोन गटात वाद झाला असून गोळीबारही झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

Violence erupts again in Manipur 5 killed in gunfight between armed groups | मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ५ जण ठार

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून दोन सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर येथील जिरीबाममध्ये आज सकाळी झालेल्या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला. झोपेत असताना एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी दोन गट शस्त्रासह समोरा समोर आले,या गोळीबारात आणखी ४ जण ठार झाले.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उग्रवादीयांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ५ किमी अंतरावर एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात प्रवेश केला आणि तो झोपेत असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर, सुमारे ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये दोन समुदायांमध्ये वाद सुरू झाला, यामध्ये ३ पहाडी अतिरेक्यांसह ४ सशस्त्र लोकांचा मृत्यू झाला. या आठवड्याच्या सुरुवातीलाही जिल्ह्यात जाळपोळीची घटना घडली होती. येथे काही लोकांनी बोरोबेकरा पोलीस ठाण्याच्या जाकुराधोर येथील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे ३ खोल्यांचे रिकामे घर जाळले होते.

१ ऑगस्ट रोजी आसाममधील कछार येथे सीआरपीएफच्या देखरेखीखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत, दोन भिन्न समुदायांच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापीत करण्यासाठी आणि जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी एक करार केला. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

जिरिबाम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीला आसाम रायफल्स आणि सीआरपीएफचे जवान आणि जिरीबाम जिल्ह्यातील हमार, मेईतेई, थाडौ, पायते आणि मिझो समुदायांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. जिरिबाम जिल्ह्याबाहेरील अनेक हमर आदिवासी संस्थांनी कराराचा निषेध केला.

Web Title: Violence erupts again in Manipur 5 killed in gunfight between armed groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.