हिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 09:01 PM2020-01-26T21:01:30+5:302020-01-26T21:07:29+5:30
मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नोटबंदी, जीएसटीपासून ते स्वच्छता अभियानाचा उल्लेख केला. देशाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या अनेक निर्णयांचा उहापोहही केला. तसेच, नागरिकांनी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. हिंसा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही, असेही मोदींनी म्हटले.
मोदींचा मन की बात हा कार्यक्रम रविवारी सकाळी 11 वाजता घेण्यात येतो. मात्र, प्रजासत्ताक दिनामुळे पंतप्रधानांनी आजची मन की बात सायंकाळी केली. मन की बात कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मोदींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, शांती आणि चर्चेतूनच प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघत असतो. हिंसा हे कुठल्याच समस्येचं उत्तर नाही. त्यामुळे, देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहनही मोदींनी नागरिकांना केलं.
देशात सीएए आणि एनआरसीवरुन मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिसांत्मक वळण लागले आहे. त्यास, अनुसरुनच मोदींनी हे वक्तव्य केलं. तसेच, खेलो इंडिया कार्यक्रमाशी एकरुप होण्याचं आवाहनही मोदींनी भारतीयांना केलं. तर, आसाम सरकारने अतिशय उत्कृष्टपणे ही स्पर्धा नियोजनबद्ध रितीने खेळवली, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.
पद्म पुरस्कारासाठी यंदा तब्बल 46 हजार अर्ज आले होते. ही संख्या 2014 च्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. या आकडेवारीवरुनच हे पुरस्कार जनतेचे पुरस्कार बनल्याचं दिसून येतंय, असे मोदींनी म्हटले