नोटाबंदीचा दहशतवादाला दणका, जम्मू काश्मीरमधील हिंसाचार 60 टक्यांनी कमी

By admin | Published: January 7, 2017 10:49 AM2017-01-07T10:49:21+5:302017-01-07T11:25:29+5:30

काश्मीर खो-यासह अन्य ठिकाणी होणा-या दहशतवादावर नोटाबंदीच्या माध्यमातून करण्यात आलेला वार यशस्वी होताना दिसत आहे

Violence in terrorism, terrorism in Jammu and Kashmir, 60 percent lesser violence | नोटाबंदीचा दहशतवादाला दणका, जम्मू काश्मीरमधील हिंसाचार 60 टक्यांनी कमी

नोटाबंदीचा दहशतवादाला दणका, जम्मू काश्मीरमधील हिंसाचार 60 टक्यांनी कमी

Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 7 - नोटाबंदी निर्णयामुळे अंडरवर्ल्डचं कंबरड मोडलं असताना दहशतवादालाही याचा चांगलाच फटका बसल्याचं दिसत आहे. काश्मीर खो-यासह अन्य ठिकाणी होणा-या दहशतवादावर नोटाबंदीच्या माध्यमातून करण्यात आलेला वार यशस्वी होताना दिसत आहे. गेल्या तीस दिवसांपासून नोटाबंदीच्या परिणामांची तपासणी करणा-या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार नोटाबंदी निर्णयामुळे दहशतवाद्यांना होणा-या फंडिंगला आळा बसला आहे. यामुळेच काश्मीर खो-यातील दहशतवादाशी संबंधित हिंसाचार 60 टक्क्यांनी कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या महिन्यात फक्त एक बॉम्बस्फोट झाला आहे. याशिवाय नोटाबंदी निर्णयामुळे नक्षवाद्यांचंही कंबंरडं मोडलं आहे. भारतामध्ये हवाला एजंट्सच्या कॉल ट्राफिकमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली आहे.  
 
(नोटाबंदीनंतर 48 तासांत विकलं गेलं 4 टन सोनं)
 
हवालामध्ये पेमेंट रोख होते, आणि यामध्ये 500 आणि 1000 च्या नोटांचा समावेश असतो. पण 8 नोव्हेंबरला नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर या नोटांची किंमत फक्त रद्दीपुरती उरली आहे. याचा हवाला ऑपरेटर्सना खूप मोठा फटका बसला असून कॉल ट्राफिकमध्ये 50 टक्क्यांची घसरण झाली आहे.  
 
नोटांमध्ये करण्यात आलेल्या बदल आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे सीमेपलीकडच्याही बनावट नोटांच्या धंदयावरही चांगलाच परिणाम झाल्याचं सरकारी अधिकारी आणि गुतप्तर यंत्रणेने सांगितलं आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तानमधील क्वेटामध्ये आणि कराचीमधील प्रेसमध्ये बनावट नोटा छापल्या जात होत्या. नोटाबंदी निर्णयानंतर या प्रेस बंद करण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. गुप्तचर यंत्रणांच्या तपासात ही माहिती समोर आली आहे'.
 
8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. यावेळी त्यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. देशाला संबोधित करताना यावेळी दहशतवादाशी लढा देण्यासाठी नोटाबंदीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात असलेल्या बनावट चलनामध्ये 500 आणि 1000 च्या नोटांच प्रमाण जास्त आहे. 
 
नोटाबंदीच्या परिणामांची माहिती घेण्यासाठी सर्व राज्यांमधून माहिती मागवण्यात आली होती. खासकरुन संवेदनशील राज्यांमधून सुचना मागवण्यात आल्या. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काश्मीरमधील पाक पुरस्कृत दहशतवाद, बनावट नोटा आणि नक्षवाद्यांच्या फंडिंगवर झालेल्या परिणामावर चर्चा करण्यात आली. 'काश्मीर खो-यात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचं नेटवर्क कमकुवत झाल्याने दहशतवाद विरोधी ऑपरेशन्स चालवण्यात आले. पैसेच नसल्याने स्थानिकांना रोख देऊन दगडफेक करायला सांगणंही कठीण झालं आहे', अशी माहिती अधिका-याने दिली आहे. 
 
 

Web Title: Violence in terrorism, terrorism in Jammu and Kashmir, 60 percent lesser violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.