टिपू सुलतानच्या जयंतीवरून हिंसाचार

By admin | Published: November 10, 2015 10:58 PM2015-11-10T22:58:55+5:302015-11-10T22:58:55+5:30

अठराव्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंती समारंभाच्या आयोजनावर मंगळवारी उसळलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषदेचा एक नेता ठार, तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.

Violence from Tipu Sultan's Birthday | टिपू सुलतानच्या जयंतीवरून हिंसाचार

टिपू सुलतानच्या जयंतीवरून हिंसाचार

Next

मादीकेरी (कर्नाटक) : अठराव्या शतकातील म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या जयंती समारंभाच्या आयोजनावर मंगळवारी उसळलेल्या हिंसाचारात विश्व हिंदू परिषदेचा एक नेता ठार, तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.
येथून जवळच असलेल्या कोडागू जिल्ह्यातील एका भागात अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात एक युवकही जखमी झाला. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक पाठविण्यात आली आहे.
जयंती कार्यक्रमाचे समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटल्याने शेकडो लोकांना पांगविण्याकरिता पोलिसांना लाठीमारासोबतच अश्रुधूर सोडावा लागला. यावेळी झालेल्या दगडफेकीत विहिंपचे नेते कुटप्पा डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. राज्य शासनातर्फे प्रथमच टिपू सुलतान जयंती साजरी करण्यासाठी राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना हा हिंसाचार भडकला आहे. काही संघटना टिपूला धर्मांध मानत असल्याने भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध या संघटनांनी कोडागू जिल्ह्यात मंगळवारी बंदचे आवाहन केले होते.
दरम्यान, गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी सांगितले की, चामराजनगर आणि म्हैसूर जिल्ह्यातून मादीकेरीला अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Violence from Tipu Sultan's Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.