ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार, आता १ फेब्रुवारीला ‘संसद मार्च’ होणार? शेतकऱ्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Published: January 27, 2021 09:35 PM2021-01-27T21:35:52+5:302021-01-27T21:36:37+5:30
Farmer Protest : ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकराने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काल आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. या हिंसाचाराचे पडसाद शेतकरी आंदोलनामध्ये उमटले आहे. ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने १ फेब्रुवारी रोजी होणारा संसद मार्च रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा मोर्चा सरकारी कारस्थानाची शिकार झाला. दीप सिद्धू हा आरएसएसचा एजंट आहे. दीप सिद्धू याने लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवून तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे देश आणि आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
On Martyrs' Day, we'll hold public rallies across India on behalf of the farmers' agitation. We will also keep a one-day fast. Our March to the Parliament on Feb 1st stands postponed for now due to this (yesterday's violence): Balbir S Rajewal, Bhartiya Kisan Union (R)#FarmLawspic.twitter.com/b5dH9U6czJ
— ANI (@ANI) January 27, 2021
बलबीर सिंह राजेवाल म्हणाले की, मी किसान मोर्चाच्यावतीने देशाची माफी मागतो. काल शेतकरी मोर्चाच्यावतीने देशाची माफी मागतो. काल शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा ऐतिहासिक होता. आम्ही २६ नोव्हेंबर रोजी येथे येऊन बसलो आहोत. काहीच अडचण झाली नाही. काही संघटना म्हणत होत्या लाल किल्ल्यावर जाऊ म्हणून. त्यांचे सरकारशी साटेलोटे होते. दीप सिद्धू ला संपूर्ण जगाने पाहिले. तो आरएसएसचा माणूस होता.