Video - दे दणादण! राफ्टिंगदरम्यान पर्यटकांमध्ये हाणामारी; जीव वाचवण्यासाठी गंगेत घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:56 AM2023-05-22T08:56:43+5:302023-05-22T08:57:56+5:30

राफ्टिंग गाईड आणि पर्यटकांमध्ये जोरदार भांडण होत आहे. गो प्रो कॅमेऱ्यामुळे मोठा वाद झाल्याचं म्हटलं जातं.

violent fight breaks out among tourists during river rafting in rishikesh watch video | Video - दे दणादण! राफ्टिंगदरम्यान पर्यटकांमध्ये हाणामारी; जीव वाचवण्यासाठी गंगेत घेतली उडी

फोटो - Canva

googlenewsNext

ऋषिकेशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राफ्टिंग गाईड आणि पर्यटकांमध्ये जोरदार भांडण होत आहे. गो प्रो कॅमेऱ्यामुळे मोठा वाद झाल्याचं म्हटलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ब्रह्मपुरीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये राफ्टिंग गाइड आणि पर्यटक एकमेकांना पॅडलने मारताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, लोक एकमेकांवर पॅडलने जोरदार हल्ला करताना दिसत आहेत. याच दरम्यान, आपला जीव वाचवण्यासाठी एका तरुणाने तरुणाला कोणताही विचार न करता थेट गंगेत उडी घेतली. यानंतर इतर राफ्टर्स त्याला मदत करतात आणि त्याला त्यांच्या राफ्टवर घेतात.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडियावर हाणामारीचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या वादाबाबत पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीच माहीत नाही. या प्रकरणाशी संबंधित कोणतीही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

गो प्रो कॅमेरा ठरला वादाचे कारण 

मिळालेल्या माहितीनुसार, वादाचं खरं कारण गो प्रो कॅमेरा आहे. या कॅमेर्‍याने पर्यटक गंगेच्या लाटा आणि त्यातील साहसांचे चित्रीकरण करतात. त्याबदल्यात गाईड पर्यटकांकडून मनमानी पैसे घेतात. या भांडणाचे कारणही तोच गो प्रो कॅमेरा असल्याचे बोलले जात आहे.

गंगा रिव्हर राफ्टिंग रोटेशन कमिटीचे अध्यक्ष दिनेश भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसारस पर्यटक आणि गाईड यांच्यात हाणामारी होत असेल तर पर्यटन विभागाने त्यावर कारवाई करावी. याशिवाय याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: violent fight breaks out among tourists during river rafting in rishikesh watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.