अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:05 AM2019-01-04T06:05:02+5:302019-01-04T06:10:01+5:30

अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले.

The violent movement of Hindu organizations in Kerala against women in Ayyappa temple | अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन

अयप्पा मंदिरातील महिला प्रवेशाविरोधात केरळमध्ये हिंदू संघटनांचे हिंसक आंदोलन

Next

कोची : अय्यप्पा मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी केरळमध्ये गुरुवारी बंद पाळला. त्याचे राज्यभरात पडसाद उमटले. हिंसाचारात एक ठार तसेच ३८ पोलिसांसह १०० हून अधिक लोक जास्त लोक जखमी झाले. याशिवाय जबरदस्तीने दुकाने बंद करू पाहणाऱ्या भाजपाच्या ४ कार्यकर्त्यांना अज्ञात इसमांनी भोसकले. हिंसक कारवायातील २५0 जणांना अटक करण्यात आली आहे.
हिंदू संघटनांच्या शिखर संस्थेने बंदची हाक दिली होती. या बंदला भाजपने पाठिंबा दिला होता. काँग्रेसनेही काळा दिन पाळला. पंडालम, कोळीकोड, कासारगोडे, ओट्टपलम येथे निदर्शकांनी काही पक्षांच्या कार्यालयावर हल्ले चढविले. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. कोळीकोड येथे अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. पल्लकडमध्ये संघ, भाजपच्या मोर्चात पत्रकारांना मारहाण करण्यात आली.
महिला भक्त दर्शन घेऊन निघून जाताच मुख्य पुजाºयाने मंदिर शुद्धीकरणासाठी एक तास बंद ठेवले. त्याने न्यायालयाचा अवमान केल्याने अ‍ॅड. दिनेश यांनी आपल्या याचिकेची लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयास केली. पण त्यास न्यायालयाने नकार दिला. मूळ निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी ४९ याचिका न्यायालयात आल्या असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर २२ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा भाजपावर आरोप : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही शबरीमाला प्रश्नाचे राजकारण करून संघ, भाजपा केरळमध्ये अशांतता व हिंसाचार करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला.

Web Title: The violent movement of Hindu organizations in Kerala against women in Ayyappa temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.