'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये हिंसक आंदोलन, मॉलमध्ये तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 12:00 AM2018-01-24T00:00:22+5:302018-01-24T00:04:41+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे. 

Violent protests in Ahmedabad against the 'Padmavat' film, breakdown in the mall | 'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये हिंसक आंदोलन, मॉलमध्ये तोडफोड

'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये हिंसक आंदोलन, मॉलमध्ये तोडफोड

Next

अहमदाबाद -  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जसजशी जवळ येते आहे तसतसे या चित्रपटाविरोधातील वातावरणही तापू लागले आहे.  'पद्मावत' सिनेमाविरोधात अहमदाबादमध्ये आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाने हिंसक रुप घेतलं आहे. अहमदबादमधील अल्फा आणि हिमालया मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचा प्रकार समोर आला आहे. 
पद्मावत चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असला तरी या चित्रपटाला सुरु असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे नाहीत. या चित्रपटाला विरोध करणार्यांनी आज अहमदाबादमधील काही मॉल्समध्ये जाऊन तोडफोड केली व तीन मॉलमध्ये आग लावण्याचेही प्रकार घडले. अहमदाबादमधील हिमालयन मॉलच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांचीही नासधूस करण्यात आली. मेमनगर भागातील एका मॉलमध्येही जमावाने तोडफोड केली. 

यापूर्वी 20 तारखेला हरियाणातील फरीदाबादमधील बल्लभगड येथील एका सिनेमाहॉलचे तिकिट काऊंटर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिल्याची घटना घडली होती. तोंडाला कपडा बांधून आलेल्या युवकांनी हा हल्ला केला व त्याचे चित्रीकरण केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

वादामुळे पद्मावती हे मूळ नाव बदलून चित्रपटाचे पद्मावत नाव करण्यात आले. पण तरीही वाद शमलेला नाही. भन्साळींनी ऐतिहासिक तथ्याची मोडतोड केल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात येतोय. भन्साळी, चित्रपटातील कलाकारांना धमकी देणा-या करणी सेनेने आता सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही धमकी दिली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलसाठी प्रसून जोशींना जयपूरमध्ये पाय ठेऊ देणार नाही अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे. 

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरीयाणा या राज्यातील चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे पण हा सर्व वाद पाहता गुजरातमधील मल्टीप्लेक्स असोशिएशनने हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Violent protests in Ahmedabad against the 'Padmavat' film, breakdown in the mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.