गुजरातमधील आंदोलनास हिंसक वळण, ४ ठार

By admin | Published: August 26, 2015 09:05 AM2015-08-26T09:05:39+5:302015-08-26T18:27:03+5:30

गुजरातमध्ये पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने बुधवारी हिंसक वळण घेतले.

Violent turn of the movement in Gujarat, 4 killed | गुजरातमधील आंदोलनास हिंसक वळण, ४ ठार

गुजरातमधील आंदोलनास हिंसक वळण, ४ ठार

Next
>ऑनलाइन लोकमत.
अहमदाबाद, दि. २६ -  ओबीसी कोट्यात आरक्षण द्या, अन्यथा २०१७ च्या निवडणुकीत गुजरातेत कमळ फुलणार नाही, असे जाहीर आव्हान देत आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या गुजरातमधील पटेल समुदायाच्या  अहमदाबादेतील भव्य रॅली विविध कारणांनी गाजली. रॅलीला हिंसेचे गालबोट लागले, निकोल परिसरात सरकारी सेवा केंद्राची जाळपोळ, सात लाख रुपयांची रोख रक्कम जळाली आणि सर्व कादपत्रे जळाली तर अहमदाबादच्या चांदलोडिया परिसरात आंदोलकर्त्यांनी रेल्वे ट्रॅक तोडून ट्रेन थांबविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चार अंदोलनकर्ते ठार झाले आहे. रॅलीदरम्यान प्रत्यक्ष रॅलीस्थळी आणि शहरात अनेक ठिकाणी संघर्ष उडाला. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमारासह अश्रुधुराचे नळकांडे फोडावे लागले. यादरम्यान आंदोलनकर्ते माजी आमदार शंकरराव गडाख आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असल्याचे वृत आहे.
अहमदाबादमध्ये १३ वर्षांनंतर नऊ भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सूरत व अहमदाबादमधील शाळा- कॉलेजेस आज बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान गुजरातमधील या आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका बसला असून अनेक ट्रेन्सचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
गुजरातमधील पटेल समाजाला ओबीसी आरक्षण दिले जावे. जर भाजप सरकारला ही मागणी पूर्ण करता आली नाही, तर 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील. आरक्षण नाही तर गुजरातमध्ये कमळदेखील नाही, असा इशाराच पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी येथे "महाक्रांती‘ रॅलीमध्ये बोलताना दिला होता. 
आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये कमळही उमलणार नाही असा इशारा हार्दिक पटेल यांनी दिला होता.
 
मोदींनी गुजरातच्या जनतेला केले शांतता राखण्याचे आवाहन 
हिंसेतून कोणाचंही भल होत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पटेल समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कालपासून गुजरात धुमसत आहे. संतप्त जमावाने गुजरातमधील अनेक जिल्ह्यात जाळपोळ व दगडफेक केली असून अहमदाबादमधील नऊ भागातं संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजराती भाषेतून संदेश दिला. ' जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतानाच चर्चेद्वारे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात' असे मोदी म्हणाले. गुजरातमधील सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. ' हिंसेतून कधीही कोणाचा लाभ होऊ शकत नाही. मात्र जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर त्यात सर्वांचेच हित आहे. मी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. गुजरात विकासाची नवी उंची गाठत असून राज्यातील संपूर्ण जनतेने त्यात सहभागी व्हायला हवे. लोकशाहीच्या मर्यादेचे सर्वांनी पालन केले पाहिजे,' असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

Web Title: Violent turn of the movement in Gujarat, 4 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.