VIP व्यक्तीचा बकरा चोरीला गेला; कोरोनाचा बंदोबस्त सोडून पोलीस लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 07:42 PM2020-05-27T19:42:39+5:302020-05-27T19:43:11+5:30
इथे म्हैस नाही तर बकरा चोरीला गेला आहे. तो देखील कोणत्या साध्या सामान्य माणसाचा नाही तर एका व्हीआयपीचा बकरा आहे.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात एके काळी राजकीय वातावरण तापले होते, जेव्हा सपाचे तत्कालीन मंत्री आझम खान यांची म्हैस चोरीला गेली होती. झारखंडच्या धनबादमध्येही असाच प्रकार घडला आहे. मात्र, इथे म्हैस नाही तर बकरा चोरीला गेला आहे. तो देखील कोणत्या साध्या सामान्य माणसाचा नाही तर एका व्हीआयपीचा बकरा आहे. यामुळे आधीच कोरोनाच्या संकटात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची झोप उडाली आहे.
धनबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोबिन गोराई यांच्या मोठ्या भावाने बकरा पाळला होता. निरसामध्ये दोन्ही भाऊ राहतात. एका बाईकवरून आलेल्या चोरट्याने कोणी नसल्याचे पाहून त्यांचा बकराच उचलून नेला. अखेर प्रश्न प्रतिष्ठेचा झाला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या घरात चोरी झाली होती. त्यांनी लगेचच याची तक्रार पोलिसांकडे केली.
जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बकऱ्याची चोरी झाल्याचे समजताच निरसा पोलिसांनी धावपळ सुरु केली. आधीच कोरोना लॉकडाऊनच्या बंदोबस्ताने वैतागलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर बकरा चोरी करताना दिसत आहे. या आधारावरच पोलीस चोरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचाच बकरा चोरीला गेल्याचे समजताच हा विषय कोयलांचल भागात चवीने चर्चिला जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
कोरोनाच्या संकटातही पीपीई किट खरेदीत घोटाळा; हिमाचल भाजपा प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
लॉटरीच लागली! Work from Home कर्मचाऱ्याला 'ही' कंपनी ७५००० रुपये असेच देणार
तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटलमध्ये वाट पाहतोय
SBI चा ठेवीदारांना मोठा धक्का; मे महिन्यातच दोनदा व्याजदर घटविले