व्हीआयपींची सुरक्षा सीआरपीएफकडे; एनएसजी कमांडोंना केले मुक्त; केंद्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:20 AM2024-10-17T10:20:20+5:302024-10-17T10:21:38+5:30
गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेच्या कामातून राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी) कमांडोंना मुक्त केले आहे. तर, त्यांच्या जागेवर नऊ उच्च-जोखीम व्हीआयपींची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.
गृह मंत्रालयाने विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची एक नवीन बटालियनदेखील मंजूर केली आहे. त्यांना संसद सुरक्षा कामातून बाजूला केले आहे आणि आता सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेशी संलग्न केले जाईल.
४५० ‘ब्लॅक कॅट’ कमांडो होतील मुक्त
- केंद्र सरकारचे असे मत आहे की, एनएसजीचा मूळ उद्देश विशेषत: दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी मोहीम हाताळणे हा आहे.
- व्हीआयपींना सुरक्षा देण्याचे काम त्यांच्या मर्यादित व विशेष क्षमता असलेल्या जवानांवर ओझे ठरत आहे. या निर्णयामुळे ४५० ‘ब्लॅक कॅट’ कमांडो मुक्त होतील.