"कधी बॉम्ब पडेल माहीत नाही, स्वप्नातही सायरनचा आवाज येतो"; थरकाप उडवणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 02:11 PM2023-10-16T14:11:10+5:302023-10-16T14:12:58+5:30

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले आहेत. मात्र, भारत सरकार आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत आहे.

vipin sharma who witnessed hamas militants engaging in combat with israeli armed forces | "कधी बॉम्ब पडेल माहीत नाही, स्वप्नातही सायरनचा आवाज येतो"; थरकाप उडवणारा अनुभव

"कधी बॉम्ब पडेल माहीत नाही, स्वप्नातही सायरनचा आवाज येतो"; थरकाप उडवणारा अनुभव

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले आहेत. मात्र, भारत सरकार आपल्या नागरिकांची सुखरूप सुटका करत आहे. घरी परतणाऱ्या या लोकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. असाच एक विद्यार्थी म्हणजे विपिन शर्मा जो नुकताच भरतपूरला परतला आहे. युद्धातील दृश्य पाहून विपिन अजूनही घाबरतो.

विपिनने सांगितलं की, सायरनचा आवाज ऐकून तो शेल्टरमध्ये जायचा. हे युद्ध एखाद्या दुःखद कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा युद्ध होतं तेव्हा तो खूप घाबरला होता. त्याला स्वप्नातही सायरनचा आवाज यायचा. विपिन हा इस्रायलच्या वेस्ट बँक येथील एरियल विद्यापीठात कॅन्सरवर संशोधन करत आहेत. तो गाझा पट्टीपासून 100 किलोमीटर दूर राहत होता.

विपिनने दिलेल्या माहितीनुसार, युद्धादरम्यान त्याला भीती वाटत होती की, कधी मिसाईल आपल्यावर पडेल काय माहीत. ज्या ठिकाणी युद्ध सुरू होतं ते गाझामध्ये असलं तरी युद्धाची दहशत हृदयात व मनात घर करून होती. एरियल युनिव्हर्सिटीने युद्धाच्या दृष्टीने बॉम्ब शेल्टर बांधले होते. जेव्हा जेव्हा सायरन वाजायचा तेव्हा ते या शेल्टरमध्ये आसरा घेत असत. या वेळी सायरन वाजल्यानंतर 10 सेकंदात शेल्टरमध्ये जावे लागले.

आपली पत्नी आणि मुलाला घेऊन जाण्यासाठी व्हिसाची तयारी केली होती. मात्र आता युद्धामुळे ते रद्द करण्यात आले आहे. जोपर्यंत शांतता होत नाही तोपर्यंत सोडण्याचा विचार नाही असं देखील म्हटलं आहे. विपिन शर्मा यांचे वडील उमेश शर्मा हे राष्ट्रीय मोहरी संशोधन संचालनालयात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: vipin sharma who witnessed hamas militants engaging in combat with israeli armed forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.