Video : नाल्यात उडी, मग दुधाने आंघोळ; AAP च्या 'नायक' नगरसेवकाला पाहून आठवला अनिल कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 09:23 AM2022-03-23T09:23:22+5:302022-03-23T09:23:56+5:30
Delhi MCD Election Latest News: जेव्हा AAP नगरसेवक हासिब अल हसन नाल्याची सफाई करण्यासाठी निघाले तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.
दिल्लीत महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी दिल्लीतील एमसीडी युनिफिकेशन विधेयकाला मंजुरी दिली दिली. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे (AAP) नगरसेवक हसीब अल हसन बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरच्या शैलीत दिसले. हसीब अल हसन यांनी पूर्व दिल्लीतील एका नाल्यात उडी मारली आणि तो नाला साफ केला. त्यानंतर लोकांनी त्यांना दुधाने आंघोळ घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेव्हा आपचे नगरसेवक हासिब अल हसन हे नाल्याची सफाई करण्यासाठी निघाले तेव्हा अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. तसंच यानंतर त्यांनी नाल्यात उडी घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी त्यांना दुधानं आंघोळ घातली. आपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाविरोधातही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
नाले में https://t.co/apkG8A1Md5pic.twitter.com/3ZfXcpeScS
— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) March 22, 2022
गेल्या निवडणुकांमधून धडा घेत यावेळी आप एमसीडी निवडणुकांमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळेच आप आता जोरदार तयारीत लागली आहे. तसंच पक्षानं भाजपला घेरण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. आप कडून एमसीडी निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याचा आरोप करत आहे. मंगळवारीही आपनं दिल्लीत एमसीडी निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसंच एमसीडी निवडणुका वेळेतच घेण्यात याव्या अशी विनंतीही त्यांनी केली.
एमसीडी चुनावी ड्रामा !
पूर्वी दिल्ली से आप पार्षद हसीब उल हसन नाले की सफाई के लिए नाले में उतरे ,फिर उन्हें दूध से नहलाया गया pic.twitter.com/NAIjgdHpnH— Mukesh singh sengar मुकेश सिंह सेंगर (@mukeshmukeshs) March 22, 2022
तिन्ही पालिका होणार एकत्र
दरम्यान, दिल्लीतील तिन्ही पालिका मिळून एक करण्याच्या विधेयकावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. आता याच आठवड्यात हे विधेयक संसदेत आणलं जाऊ शकतं. तसंच हे विधेयक मंजूर झाल्यानंतर तिन्ही पालिकांसाठी मिळून एकच महापौर असणार आहे. तसंच नॉर्थ, ईस्ट आणि साऊथ यांच्या ऐवजी एकच पालिका असेल. मार्च महिन्यातच दिल्लीत पालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची अपेक्षा होती. परंतु अद्यापही ती झालेली नाही.