लग्नाच्या दिवशी वधूनं साडीवरच दाखवला मार्शल आर्टचा जल्वा, परफॉर्म पाहून लोक हैराण; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 12:06 PM2021-07-04T12:06:27+5:302021-07-04T12:10:22+5:30
आश्चर्याची गोष्ट म्हणजे निशाने साडीवरच मार्शल आर्ट परफॉर्म केले. व्हिडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की निशा आपल्या लग्नाच्या साडीवर आहे आणि ती रस्त्यावरच मार्शल आर्ट्स करत आहे.
तूतुकुडी - लग्नाच्या पेहरावातील एका वधूचा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ही नववधू मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक दाखवत आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूतील तूतुकुडी (Thoothukudi) (जुने नाव तूतीकोरिन) जिल्ह्यातील आहे आणि या वधूचे नाव निशा असे आहे. (Viral Video newly bride performing martial arts on her wedding day to spread awareness about self defense)
निशाने येथे आपल्या लग्नाच्या काही वेळानंतर पारंपरिक मार्शल आर्टची झलक दाखवली. निशा म्हणाली, महिलांनी स्वसंरक्षणात सक्षण व्हावे, असे मला वाटते. तिने हा संदेश देण्यासाठी आपल्या लग्नाचा दिवसच निवडला. निशाचे मार्शल आर्ट्स पाहून अनेक लोकांनी तिचे कोतुक केले आहे. निशाचा परफॉर्मन्स लोक टक लावून पाहत आहेत.
एकमेकांना हार घातले, सप्तपदीही झाली अन् ऐनवेळी लग्नाच्या मंडपातून उठून गेली नवरी, कारण....
आश्चर्याची गोष्ट म्हणजे निशाने साडीवरच मार्शल आर्ट परफॉर्म केले. व्हिडियोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की निशा आपल्या लग्नाच्या साडीवर आहे आणि ती रस्त्यावरच मार्शल आर्ट्स करत आहे.
I performed traditional martial arts before the villagers soon after the wedding to make women aware of the importance of self-defense. I have been learning this for past 3 years. I want more people to learn this art: Nisha, from Thoothukudi district in Tamil Nadu pic.twitter.com/cMhOXUOv19
— ANI (@ANI) July 1, 2021
तीनवर्षांपासून करते पारंपरिक सराव -
निशा आता 22 वर्षांची आहे. ती म्हणते, गेल्या तीन वर्षांपासून ती पारंपरिक मार्शल आर्टचा सराव करते. निशा महिलांच्या आत्मसंरक्षणाला प्रोत्साहित करू इच्छिते. याशिवाय ती आपली पारंपरिक कला आणि आपले प्रदर्शनही प्रमोट करू इच्छिते. निशा म्हणाली, महिलांनी स्वसंरक्षणासाठी सजग रहावे, म्हणूनच मी लग्नाच्या दिवशीच गावकऱ्यांसमोर मार्शल आर्टचे प्रदर्शन केले. मी गेल्या तीन वर्षांपूनच हे शिकत आहे. तसेच आणखी लोकांनी हे शिकावे अशी माझी इच्छा आहे. निशाच्या या व्हायरल व्हिडिओवर हजारो लोकांनी मनसोक्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.