नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; भाजपने कारवाई केली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 03:03 PM2024-09-13T15:03:38+5:302024-09-13T15:04:17+5:30
एका भाजपा नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या प्रकरणी आता पक्षाने मोठी कारवाई केली आहे.
राजस्थान येथील एका भाजपा नेत्याचा एका महिलेसोबत संशयास्पद व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता पक्षाने मोठी कारवाई केली आहे. उदयपूर भाजपा देहत अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष नत्थे खान पठाण यांचा एका महिलेसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नाथे खान महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत बसलेले दिसत आहेत.
तुमच्या वाहनावरील दंड माफ करायचाय? मग नॅशनल लोक अदालतीला भेट द्या; प्रक्रिया समजून घ्या
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. नत्थे खान यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून संबंधीत महिला आपली चौथी पत्नी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या पत्नीशी बोलत असल्याचा दावा त्यांनी केला. हे माझे वैयक्तिक आयुष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
नत्थे खान यांनी सांगितले की, कोणीतरी त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केलेला व्हिडीओ ग्रुपवर अपलोड केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कुराबाद-बांबोरा परिसरातील एका ग्रुपमध्ये हा व्हिडीओ खान यांच्या मोबाइलवरून शेअर करण्यात आला आणि त्यानंतर ग्रुपमधील काही लोकांनी पठाण यांना याची माहिती दिली.
यावर आता नत्थे खान यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मला चार पत्नी होत्या. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर व्हिडिओमध्ये दिसणारी महिला चौथी पत्नी आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी या महिलेशी लग्न केले होते. नाठे यांच्या दोन्ही पत्नी हिंदू धर्माच्या आहेत. एक पत्नी कुराबादमध्येच राहते. तर दुसरी पत्नी उदयपूर शहरात राहते.
नत्थे खान हे एक मोठे नेते आहेत. १० वर्षात तिसऱ्यांदा त्यांच्याकडे मोर्चा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यांच्या कुटुंबाचा राजकारणातही प्रभाव आहे. त्यांची सून अस्मा खान यांनी २०१५ मध्ये कुराबाद येथे भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक जिंकली होती.