कौतुकास्पद ! विरुष्का विकणार लग्नाचे फोटो, मिळणा-या पैशातून करणार समाजकार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:47 IST2017-12-13T18:56:18+5:302017-12-13T19:47:56+5:30
विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

कौतुकास्पद ! विरुष्का विकणार लग्नाचे फोटो, मिळणा-या पैशातून करणार समाजकार्य
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या तोंडी एक विषय हमखास आहे तो म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचा. दोघांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. विरुष्का 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नातील प्रत्येक क्षण आणि बातमी मिळवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. लग्नाचे अजून काही फोटो समोर येतायत याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. पण लग्नातील हे फोटो काढण्यामागे विराट आणि अनुष्काचं एक खास कारण होतं. हे सर्व फोटो एका अमेरिकन मॅगजिनला विकण्यात येणार असून, मिळणारे पैसे दान म्हणून देण्यात येणार आहेत.
विराट आणि अनुष्काने मिळणा-या पैशातून समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातून मिळालेलं जमेल तितकं परत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लवकरच विरुष्काच्या लग्नाचे फोटो एका मॅगजिनच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध फॅशन मॅगजिन असणार आहे. विरुष्काच्या या निर्णयामुळे चाहते शुभेच्छांनंतर आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
मुंबई आणि दिल्लीत जंगी रिसेप्शन
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. सध्या विराट आणि अनुष्का रोममध्ये हनिमून साजरा करत आहेत. इकडे त्यांचे कुटुंबिय मात्र रिसेप्शनच्या तयारीत व्यस्त आहेत. विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं रिसेप्शन कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला बॉलिवूड आणि क्रिकेटर्ससाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनला मोठमोठे सेलिब्रेटी आणि क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत.
अनुष्काचा बालपणीचा क्रश होता विराट कोहली
अनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं.