'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:34 PM2022-12-10T15:34:41+5:302022-12-10T15:37:17+5:30

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे.

virat kohli century odi cricket punjab cm bhagwant mann comment on century gujarat election ind vs ban | 'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!

'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!

googlenewsNext

नवी दिल्ली-

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे. पण या शतकासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. कोहलीचं आजचं शतक जसं महत्वाचं ठरलं त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विधानाचाही योगायोग आज साधला गेला आहे. कारण आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एका कार्यक्रमात विराट कोहलीचा उल्लेख केला होता. 

गुजरातमधील निवडणुकीत 'आप'च्या पदारात अपयश आलं याबाबत बोलत असताना भगवंत मान यांनी विराट कोहली देखील रोज-रोज शतक ठोकत नाही, असं उदाहरण दिलं होतं. मान यांच्या विधानाच्या चार तासांनी तिथं बांगलादेशात विराट कोहलीनं चाहत्यांची शतकाची प्रतिक्षा संपवली. 

काय म्हणाले होते भगवंत मान?
आजतकच्या कार्यक्रमात बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निराशाजनक कामगिरीवर बोलताना विराट कोहलीचं उदाहरण दिलं. "विराट कोहली देखील दररोज शतक ठोकत नाही ना, आम्ही सातत्यानं मेहनत करत आहोत", असं मान म्हणाले होते.

अन् कोहलीनं ठोकलं शतक
भगवंत मान यांनी हे विधान केलं तेव्हा भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळत होता. यात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करत आपलं ४४ वं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केलं. कोहलीच्या बॅटमधून गेल्या तीन वर्षांपासून वनडेत शतक पाहायला मिळालं नव्हतं. वनडेत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: virat kohli century odi cricket punjab cm bhagwant mann comment on century gujarat election ind vs ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.