त्या भित्र्यांना पुरुष म्हणवण्याचा अधिकारी नाही - विराट कोहली
By admin | Published: January 6, 2017 01:06 PM2017-01-06T13:06:51+5:302017-01-06T13:11:07+5:30
बंगळुरू तरुणी छेडछाड घटनेवरुन क्रिकेटर विराट कोहलीनं संताप व्यक्त करत बघ्याच्या भूमिकेत असणा-या समाजाला फटकारले आहे.
ऑनलाइन लोकमत
This country should be safe & equal for all. Women shouldn't be treated differently. Let's stand together & put an end to such pathetic acts pic.twitter.com/bD0vOV2I2P
— Virat Kohli (@imVkohli) 6 January 2017
Change your thinking and the world will change around you. pic.twitter.com/FinDIYv2aV
— Virat Kohli (@imVkohli) 6 January 2017
काय आहे घटना -
31 डिसेंबरच्या रात्री एमजी रोड आणि ब्रिगेड रोडवर नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. रात्री 11 वाजता काही हुल्लडबाजांनी महिलांना हात लावण्यास आणि टिप्पणी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे परिसरात 1500 पोलीस तैनात असतानाही हा प्रकार घडला. या घटनेचे फोटो समोर आले असतानाही कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. हुल्लडबाजांनी अर्धी रात्र झाल्यानंतर सगळ्या सीमा पार केल्या आणि महिलांना हवं तिथे स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलांचा विनयभंग होत होता. परिस्थिती एवढी बिघडली होती की जमलेल्या तरुणी, महिलांनी सँडल, चपला हातात घेऊन मदतीसाठी धावण्यास सुरुवात केली.
कोणताही गुन्हा नोंद नाही -
घटनेचे फोटो समोर आल्यानंतर तसंत प्रत्यक्षदर्शी असतानाही पोलिसांनी मात्र अजून कोणताच एफआयआर दाखल झालं नसल्याचं सांगितलं होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उपायुक्त संदिप पाटील यांनी 'महिलांची कुटुंबियांशी चुकामूक झाली होती, त्यांचा शोध लागत नसल्याने मदत मागत होत्या,' असा दावा केला आहे. विनयभंगाचा कोणताच गुन्हा दाखल केला गेला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
महिलांचे कपडे काढून केला विनयभंग -
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनी दिलेली माहिती मात्र वेगळीच होती. चर्च मार्गावर तैनात एका महिला पोलिसाने 'काही हुल्लडबाजांनी दारुच्या नशेत असलेल्या महिलेचे कपडे काढून तिची छेड काढल्याचं', सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमजी आणि ब्रिगेड रोडवर 1500 पोलीस कर्मचारी तैनात होते.
नेत्यांची जीभ घसरली -
कर्नाटकचे मंत्री जी परमेश्वर यांच्यासोबतच अबू आझमी यांनी महिलांनी तोकडे कपडे घातले की अशा घटना होतात असं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.